शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांना फटका... मेगाब्लॉक आणि पावसाचाही

By admin | Updated: June 26, 2017 01:33 IST

ठाकूर्लीच्या उड्डाणपुलासाठी रेल्वेने डोंबिवली आणि कल्याणदरम्यान घेतलेल्या मेगाब्लॉकवेळीच पावसानेही रेल्वे वाहतुकीचे तीनतेरा

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : ठाकूर्लीच्या उड्डाणपुलासाठी रेल्वेने डोंबिवली आणि कल्याणदरम्यान घेतलेल्या मेगाब्लॉकवेळीच पावसानेही रेल्वे वाहतुकीचे तीनतेरा वाजवल्याचे प्रवाशांचे हाल झाले. कल्याण-डोंबिवलीदरम्यान रेल्वे वाहतूक सहा तास बंद असल्याने पर्याय म्हणून कल्याण-डोंबिवली पालिकेच्या परिवहन सेवेने जादा बस सोडण्याचे केलेले नियोजन फसले आणि रिक्षाचालकांनी नेहमीप्रमाणेच प्रवाशांची लूट केली. त्या काळात पोलिसांनी काहीही कारवाई केली नाही. सकाळी ९ ते दुपारी तीनपर्यंत धीम्या मार्गावरील आणि सकाळी नऊ ते दुपारी एकपर्यंत जलद मार्गावरील वाहतूक बंद राहील, असे र्लेवने जाहीर केल्याने डोंबिवली रेल्वे स्थानक ते कल्याण स्थानकादरम्यान केडीएमटीच्या बस सोडण्याचे नियोजन होते. पण ते नेहमीप्रमाणे फसले. त्यामुळे रिक्षेचा आसरा घेण्यावाचून प्रवाशांकडे पर्याय उरला नाही. रात्रभर पाऊस पडत असल्याने आणि कळवा स्थानकादरम्यान रूळांत पाणी भरल्याने हा मेगाब्लॉक होणार की नाही, याबद्दल सकाळी रेल्वे अधिकाऱ्यांत चर्चा झाली. पण पावसाचा आणि तुंबलेल्या पाण्याचा जोर ओसरू लागल्याने रेल्वेने ठाकूर्लीच्या उड्डाणपुलासाठी गर्डर टाकण्याच्या कामाला सुरुवात केली. रविवार आणि पावसामुळे नेहमीपेक्षा कमी प्रवासी असले तरी पर्यायी वाहतुकीचे नियोजन कोलमडले. अंबरनाथहून-उल्हासनगर आणि उल्हासनगरहून कल्याणचे रिक्षाभाडे एरव्ही प्रत्येक प्रवाशासाठी प्रत्येकी १५ रुपये आकारले जाते. त्यात काही ठिकाणी पाच रूपये जादा घेतले गेले. पण कल्याण रेल्वे स्थानकातील रिक्षा चालकांनी टिटवाळा, अंबरनाथ, बदलापूर आणि डोंबिवलीकडे जाण्यासाठी २०० ते ३०० रुपये भाड्याची वसूली केली. कल्याण रेल्वे स्थानकातून डोंबिवलीकडे जाणाऱ्या एका प्रवाशाकडून शेअर भाडे २४ रुपये घेतले जाते. ते रविवारी ३० ते ५० रूपये उकळण्यात आले. कल्याण, डोंबिवली स्थानकात खूप कमी रिक्षा होत्या. त्यातच पावसामुळे सखल भागात पाणी साचल्याने रस्त्यावर वाहतूक कोंडी होती. प्रवाशांनी बससाठी कल्याण डेपोत गर्दी केली. तेथून सुटणारी प्रत्येक बस भरलेली होती. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन सेवेकडून डोंबिवली ते कल्याणदरम्यान दहा विशेष बस चालविण्यात आल्या. ठाकुर्लीतील रेल्वे प्रवाशांची कल्याण किंवा डोंबिवली या दोन्ही ठिकाणी जाण्यासाठी खूप तारांबळ झाली.