शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

ठाकुर्ली उड्डाणपूल परिसरात वाहतूक कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 00:42 IST

ठाकुर्ली उड्डाणपूल परिसर आणि पश्चिमेतील सुभाष रस्ता, महात्मा फुले रस्ता, दीनदयाळ पथ या तिन्ही मुख्य रस्त्यांवर सोमवारी वाहतूककोंडी झाल्याचे पाहायला मिळाले.

डोंबिवली : वाहतूक विभागाच्या योग्य नियोजनाअभावी ठाकुर्ली उड्डाणपूल परिसर आणि पश्चिमेतील सुभाष रस्ता, महात्मा फुले रस्ता, दीनदयाळ पथ या तिन्ही मुख्य रस्त्यांवर सोमवारी वाहतूककोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे वाहनचालक हैराण झाले होते.कोपर दिशेकडील उड्डाणपूल कमकुवत झाल्याने तो सर्वच प्रकारच्या वाहनांसाठी रविवारी सायंकाळपासून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक ठाकुर्ली उड्डाणपूलमार्गे वळवण्यात आली आहे. त्यासाठी काही रस्ते वाहतूक एकदिशा मार्ग केले आहेत. तर, काही ठिकाणी पार्किंगला पूर्णत: बंदी आहे. ही नवीन वाहतूक व्यवस्था अमलात आणताना ३५ वाहतूक पोलीस व अधिकाऱ्यांवर प्रचंड ताण पडत आहे.पूर्वेला मंजूनाथ शाळेसमोरून व्ही.पी. रोडने उड्डाणपुलापर्यंत येणारा रस्ता हा एकदिशा मार्ग केला आहे. एमआयडीसीकडून येणाºया वाहनचालकांना याबाबतची माहिती नसल्याने ते मंजूनाथ शाळेजवळील वळणावर थांबत होते. तेथे वेळीच दुभाजक, बॅरिकेड्स लावले असते तर तेथील कोंडी काही प्रमाणात टळली असती. पण, अवघ्या दोन वाहतूक पोलिसांना कोंडी फोडता आली नाही. तेथे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सावरकर रोडमार्गे ठाकुर्ली पुलावर जाण्यासाठी वाहनांना पारसमणी चौकाला (टिळक पुतळा परिसर) वळसा घालून यावे लागत आहे. परंतु, तेथे वाहनांना यू-टर्न घेताना अडचणी येत आहेत. पंचायत बावडी, सारस्वत कॉलनी, ठाकुर्ली परिसर, हनुमान मंदिर परिसरातही कोंडी झाल्याने नागरिक हैराण झाले होते. रस्ते, उड्डाणपूल अरुंद असल्याने कोंडीची समस्या प्रकर्षाने जाणवत आहे.पश्चिमेला रस्त्यांच्या दुतर्फा रिक्षा, वाहने उभी असल्याने कधी नव्हे तो सुभाष रस्त्यावरही प्रचंड कोंडी झाली होती. महात्मा गांधी रस्त्यावर वाहनांच्या रांगा झाल्या होत्या. तर ठाकुर्ली पुलावरची वाहतूक कूर्मगतीने पुढे सरकत होती. कोपर दिशेकडून पूर्वेला जाणारी वाहतूकही महात्मा गांधी रस्त्याने जात असल्याने स्थानक परिसरात कोंडी झाली होती.रविवार सुटीचा वार असल्याने अनेक रहिवासी कुटुंबीयांसह बाहेर पडले होते. त्यांना त्याचा फटका बसला. त्या तुलनेने पूर्वेला मात्र जोशी हायस्कूलजवळील परिसर वगळता काही वेळ इंदिरा गांधी चौकात वाहतूककोंडी झाली होती. परंतु, स्वामी विवेकानंद रस्ता, दत्त मंदिर चौक, टंडन रस्ता, राजाजी पथ आदी भागांत मात्र कोंडी झाली नव्हती. एस.व्ही. रस्त्यावर वाहतूक पोलीस कार्यरत होते. तेथील कोंडी त्यांनी सोडवल्याने वाहनचालकांना दिलासा मिळाला. चाररस्ता, तसेच आइस फॅक्टरीजवळ कोंडी झाली होती.खड्ड्यांतून वाट काढताना कसरतघरडा सर्कल, पारसमणी चौक, सारस्वत कॉलनी येथील खड्डे तसेच पश्चिमेला महात्मा गांधी रस्त्यानंतर उड्डाणपुलाकडे येणाºया कच्च्या रस्त्यातून मार्ग काढताना वाहनचालकांची कसरत झाली होती. त्यात येजा करणाºया पावसाच्या लहानमोठ्या सरींमुळेही कोंडीत भर पडली होती.रविवारपेक्षा सोमवारचे नियोजन करणे सोपे गेले. आता वॉर्डन ठिकठिकाणी कार्यरत झाले आहेत. अजून महापालिकेकडून १० वॉर्डन मिळणार असून, आम्ही त्याच्या प्रतीक्षेत आहोत. आता फलक बहुतांशी मोक्याच्या ठिकाणी लागले आहेत. चांगले नियोजन करून वाहनचालकांना दिलासा मिळेल.- सतेज जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक,वाहतूक नियंत्रण विभाग, डोंबिवली