शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूककोंडीने भिवंडीकर झाले त्रस्त; चालणे झाले कठीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 00:46 IST

वाहतूक पोलीस गायब, ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य

भिवंडी : भिवंडी परिसरात वाहतुकीचे पोलिसांकडून नियोजन होत नसल्यामुळे कोंडीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. वंजारपट्टीनाका ते कल्याण रोड, धामणकरनाका येथे रिक्षातून जाण्यासाठी तासभर लागतो.

मंडई, नझराना, शांतीनगर, भंडारी चौक, अंजूरफाटा, मिरॅकल मॉल, कोटरगेट मशीद आदी विविध चौकांमध्ये वाहतूक पोलीस नसल्याने वाहतूककोंडी सोडवण्यासाठी चक्क नागरिकांनाच रस्त्यावर उतरावे लागत आहे. शहरात रोजच मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वाहतूककोंडीमुळे पोलिसांबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली असून ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे नागरिकांना चालणे कठीण झाले आहे. खड्ड्यांमध्ये पाणी साचून तळे निर्माण झाल्याने वाहने खड्ड्यांमध्ये पडून बंद पडत आहे. खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यामुळे दुचाकीस्वारही घसरून अपघात होत आहेत. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. पोलीस व महापालिका प्रशासनामध्ये योग्य समन्वय नसल्याने शहरातील विविध भागांत वाहतूककोंडीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. रस्त्यांवर व चौकांत वाहतूक पोलिसांची नियुक्ती केली जाते. मात्र, प्रत्यक्षात जागेवर वाहतूक पोलीस नसल्यामुळे कोंडीत भर पडत आहे.

रिक्षाचालकांना शिस्त लावणे गरजेचेरिक्षाचालक आनंद दिघे चौक, इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालय प्रवेशद्वार, भिवंडी एसटी स्टॅण्ड चौक, वंजारपट्टीनाका, तीनबत्ती चौक, प्रभुआळी, मंडई, धामणकरनाका, कासारआळी, ठाणगेआळी, पारनाका बाजारपेठ अशा विविध ठिकाणी रस्त्यांवर रिक्षाचालक कशाही रिक्षा उभ्या करून वाहतुकीला अडथळा निर्माण करत आहेत. त्यामुळे वाहतूककोंडीत भर पडत आहे. तहसील कार्यालय, अशोकनगर, कल्याण रोड, अंजूरफाटा, धामणकरनाका, भादवडनाका, गौरीपाडा, पारनाका, ब्राह्मणआळी, नझराना रोड आदी ठिकाणी रोज कोंडी होते.

टॅग्स :bhiwandiभिवंडी