शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक कोंडीचा जाच सुरूच; साकेत ते मुलुंड टोलनाक्यापर्यंत वाहनांच्या रांगा 

By अजित मांडके | Updated: July 19, 2022 11:54 IST

मंगळवारी पहाटेपासूनच पुन्हा वाहतूक कोंडीचा त्रास ठाणेकरांना सहन करावा लागला.

अजित मांडकेठाणे : मुंबई नाशिक महामार्गावरील साकेत, खारेगाव टोलनाका भागात पडलेल्या खड्ड्यांमुळे सोमवारी रात्री साकेत पूल ते मुंबईतील मुलुंड टोलनाक्यापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. त्यानंतर मंगळवारी पहाटेपासूनच पुन्हा वाहतूक कोंडीचा त्रास ठाणेकरांना सहन करावा लागला. सकाळी शाळेत जाणाऱ्या मुलांना आणि चाकरमान्यांनादेखील याचा फटका बसला. ही वाहतूक कोंडी तीन हात नाक्यापर्यंत तर दुसऱ्या बाजूने घोडबंदर पर्यंत गेली होती. या वाहतूक कुंडीचा फटका अंतर्गत रस्त्यांना देखील बसल्याचे दिसून आले.

या वाहतूक कोंडीमुळे मुंबईहून ठाणे, घोडबदंर, कल्याण, भिवंडी, नाशिकच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांचे हाल झाले. अनेक अत्यावश्यक सेवेच्या वाहनांसह रुग्णवाहिका, खासगी कंपन्यांच्या बसगाड्या, बेस्ट आणि टीएमटीच्या बसगाड्या, कार आणि दुचाकी या वाहतूक कोंडीमध्ये अडकून होत्या. अवघ्या १० मिनीटांचे अंतर पार करण्यासाठी वाहन चालकांना दोन तास लागत होते. त्यात सकाळी कपुरबावड़ी येथे ट्रक बंद पडल्याने या वाहतूक कोंडीत आणखीनच भर पडली. त्यामुळे सकाळी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसह चाकरमान्यांना याचा फटका बसला. अनेक ठिकाणी ठाणेकर नागरिक वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न करत होते. मुंबई-नाशिक महामार्गावरील साकेत पूल आणि खारेगाव टोलनाका भागात ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. शनिवारी आणि रविवारी राज्य रस्ते विकास महामंडळाने या भागात खड्ड्यांवर खडी टाकून खड्डे बुजविले होते. परंतु सोमवारी दुपारी पडलेल्या पावसामुळे खडी वाहून गेली. त्यामुळे पुन्हा या मार्गावर खड्डे पडले. त्यामुळे सोमवारी दुपारपासूनच शहरात वाहतूक कोंडीस सुरूवात झाली होती. मंगळवारी सकाळी मुंबईत कामानिमित्ताने जाणारे नोकरदार घरी परतत होते. मुलुंड टोलनाका, कोपरी पूलमार्गे ठाणे, घोडबंदर, भिवंडी, कल्याण आणि नाशिकच्या दिशेने वाहतूक करत असतात. परंतु वाहनांचा भार वाढून या मार्गावर साकेत पूल ते मुलुंड टोलनाक्यापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. तसेच साकेत ते घोडबंदर पातलीपाडा पर्यंत ही वाहतूक कोंडी झाली होती.  यामध्ये सेवा रस्ते ही जाम झाले होते. दुसरीकडे कापूरवाडी ते ढोकाळी ब्रह्मांड या मार्गावर देखील वाहतूक कोंडी झाली होती.

माजिवडा जंक्शनवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तसेच अत्यावश्यक सेवेची वाहने, रुग्णवाहिका, खासगी कंपन्यांच्या बसगाड्या, बेस्ट आणि टीएमटीच्या बसगाड्या, शेकडो कार आणि दुचाकी या वाहतूक कोंडीत अडकून होत्या. कासवगतीने या वाहनांची वाहतूक सुरू होती. त्यामुळे अवघ्या १० मिनीटांचे अंतर पार करण्यासाठी वाहन चालकांना सुमारे एक ते दीड तास लागत होता. या वाहतूक कोंडीमुळे महिला नोकरदारांचे सर्वाधिक हाल झाले.

टॅग्स :thaneठाणेTrafficवाहतूक कोंडी