शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

भारत जोडो न्याय यात्रे निमित्ताने ठाणे शहरात वाहतूक बदल, काँग्रेसचे नेते राहुल गांधी ठाण्यात येणार

By अजित मांडके | Updated: March 15, 2024 15:54 IST

भिवंडी नंतर आता शनिवारी काँग्रेसचे नेते राहुल गांधी ठाण्यात येत आहे. त्यांची यात्रा शहरातील विविध भागातून जाणार आहे. त्यामुळे वाहतुक कोंडीची शक्यता र्वतविली जात आहे. त्या अनुषंगाने ठाणे वाहतुक पोलिसांनी शहरातील महत्त्वाच्या मार्गांवर वाहतूक बदल लागू केले आहेत.

ठाणे : भिवंडी नंतर आता शनिवारी काँग्रेसचे नेते राहुल गांधी ठाण्यात येत आहे. त्यांची यात्रा शहरातील विविध भागातून जाणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीची शक्यता र्वतविली जात आहे. त्या अनुषंगाने ठाणे वाहतुक पोलिसांनी शहरातील महत्त्वाच्या मार्गांवर वाहतुक बदल लागू केले आहेत. हे वाहतूक बदल शनिवारी सकाळी ८ ते रात्री ८ यावेळेत लागू असणार असल्याची माहिती ठाणे वाहतुक विभागाने दिली आहे.

हरिनिवास चौक येथून टेलिफोन नाका किंवा गोखले रोडच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना नौपाडा पोलीस ठाण्याजवळ प्रवेशबंद असेल. येथील वाहने संत तुकाराम महाराज उड्डाणपुलावरून ब्राह्मण सोसायटी मार्गे वाहतुक करतील.

गोखले रोड मार्गावरील समर्थ भंडार येथून तीन हात नाक्याच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या हलक्या वाहनांना समर्थ भंडार येथे प्रवेशबंदी असेल. ही वाहने बी- केबिन, ब्राह्मण सोसायटी मार्गे वाहतुक करतील. तर जड किंवा मोठी वाहने गावदेवी मार्गे वाहतूक करतील.

तीन हात नाका येथून समर्थ भंडारच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना रघुवेल उपाहारगृहाजवळ प्रवेशबंदी असेल. येथील वाहने एसबीएस रोड, हरिनिवास चौक, तीन पेट्रोल पंप येथून वाहतुक करतील. कोर्टनाका येथून ठाणे स्थानकाच्या दिशेने वाहतुक करणाºया वाहनांना जीपीओ जवळ प्रवेशबंदी असेल. येथील वाहने ठाणे मध्यवर्ती कारागृह, क्रिकनाका, दादोजी कोंडदेव क्रिडा प्रेक्षागृह येथून वाहतुक करतील.

 ठाणे रेल्वे स्थानक येथून टेंभीनाक्याच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या बसगाड्या आणि इतर वाहनांना मुस चौकात प्रवेशबंदी असेल. बसगाड्या सॅटीस पूलावरून बी-केबिन, गोखले रोड मार्गे वाहतुक करतील. तर हलकी वाहने मुस चौकातून डावे वळण घेऊन वाहतुक करतील.राम मारूती रोड, गोखले रोडच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना पु.ना. गाडगीळ चौकात प्रवेशबंदी असेल. येथील वाहने तीन पेट्रोल पंप किंवा गडकरी चौक, चिंतामणी चौक मार्गे वाहतुक करतील. कळवा येथून क्रिकनाका मार्गे कोर्टनाक्याच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना उर्जिता उपाहारगृहाजवळ प्रवेशबंदी असेल. येथील वाहने ठाणे मध्यवर्ती कारागृह, जीपीओ मार्गे वाहतुक करतील.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग आणि उथळसर येथून टेंभीनाक्याच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना जिल्हा शासकीय रुग्णालय परिसरात प्रवेशबंदी असेल. येथील वाहने जिल्हा शासकीय रुग्णालय चौकातून जीपीओ, कोर्टनाका, जांभळीनाका मार्गे वाहतुक करतील.मासुंदा तलाव, गडकरी रंगातन नाट्यगृह येथून मुस चौकाच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना गडकरी चौकात प्रवेशबंदी असेल. येथील वाहने दगडी शाळा, गजानन महाराज चौक तसेच अल्मेडा चौक मार्गे वाहतुक करतील.

नवी मुंबई येथून विटावा, कळवा येथून वाहतुक करणाऱ्या वाहनांना पटणी येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने ऐरोली खाडी पूल मार्गे वाहतुक करतील.मुंब्रा, पारसिरकनगर येथून कळवा येथे वाहतुक करणाºया वाहनांना पारसिक चौकात प्रवेशबंदी असेल. येथील वाहने पारसिक चौक, गॅमन जंक्शन, खारेगाव टोलनाका मार्गे वाहतूक करतील.

पूर्व द्रुतगती महामार्गावरील कॅडबरी जंक्शन येथून ठाणे, कळवा पूल मार्गे नवी मुंबईच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना कॅडबरी सिग्नल येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने कोपरी, ऐरोली मार्गे वाहतुक करतील.

येथे वाहने उभी करण्यास बंदी

गोखले रोड, कोर्टनाका ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, शिवाजी महाराज पथ, अग्यारी मार्ग, मासुंदा तलाव, कळवा येथील पारसिक चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, कळवा नाका परिसरात वाहने उभी करण्यास बंदी असेल.