शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील व्यापाऱ्यांकडे १४३ कोटींचा कर थकीत, गुन्हा दाखल करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 01:58 IST

ठाणे जिल्ह्यात वस्तू आणि सेवाकर कायद्याखाली नोंदणीकृत व्यापा-यांची संख्या ८३ हजार एवढी आहे.

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील वस्तू व सेवाकर विभागाकडे नोंदणीकृत व्यापाºयांपैकी एक हजार २३७ व्यापाºयांनी १४३.०८ कोटींचा वस्तू व सेवाकर थकवल्यामुळे त्यांच्याविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. त्या व्यापाºयांविरोधात संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती ठाणे शहर विभागाचे राज्य कर सहआयुक्त विकास कुलकर्णी यांनी दिली.ठाणे जिल्ह्यात वस्तू आणि सेवाकर कायद्याखाली नोंदणीकृत व्यापा-यांची संख्या ८३ हजार एवढी आहे. त्यापैकी २० हजार ४२७ व्यापाºयांनी त्यांचे मासिक विवरणपत्र भरले नसल्याचे वस्तू आणि सेवाकर विभागाच्या विशेष मोहिमेत आढळून आले आहे. त्यापैकी एक हजार २३७ व्यापाºयांकडे १४३.०८ कोटी रुपयांचा वस्तू आणि सेवाकर थकीत असल्याची माहिती उघड झाली आहे. कर थकविणाºयांमध्ये जिल्ह्यातील मोठ्या व्यापाºयांचा समावेश आहे. या करचुकव्या व्यापाºयांविरुद्ध वस्तू आणि सेवाकर कार्यालयाच्या ठाणे विभागामार्फत करवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. याप्रकरणी संबंधित व्यापाºयांविरुद्ध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हेही दाखल करण्यात येणार आहेत. ज्या व्यापाºयांनी विवरणपत्रे भरलेली नाहीत, अशा दोन हजार २९६ व्यापाºयांची नोंदणी वस्तू आणि सेवाकर विभागामार्फत रद्द करण्यात आली असल्याचे राज्य कर सहआयुक्तांनी सांगितले. जे व्यापारी विवरणपत्र दाखल करणार नाहीत, अशा व्यापाºयांकडून वस्तू आणि सेवा खरेदी करणाºया व्यापाºयांनी दावा केलेल्या खरेदीवर भरलेल्या कराची वजावट नाकारण्यात येणार असल्याची माहितीही समोर आली आहे.दरम्यान, थकीत कराची रक्कम १० लाखांपेक्षा जास्त असलेल्या आणि तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी विवरणपत्र न भरलेल्या व्यापाºयांची बँक खाती गोठवण्यात आली आहेत. त्यांच्याकडून करवसुलीची कठोर कारवाई करण्यात येणार आहे.वस्तू आणि सेवाकर विभागाकडून करण्यात येणारी कारवाई टाळण्याकरिता व्यापाºयांनी त्यांची विवरणपत्रे आणि त्यानुसार देय असलेला कर विहीत मुदतीत भरावा, असे आवाहन राज्यकर सहआयुक्त विकास कुलकर्णी यांनी केले आहे.

टॅग्स :Taxकर