शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
2
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
3
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
4
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
5
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
7
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
8
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
9
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
10
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
11
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
12
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
13
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
14
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
15
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
16
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
17
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
18
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
19
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
20
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीत पी अँड टी कॉलनीतल्या रहिवाश्यांचा टाहो :टँकर नको आमच्या घरातील नळाला पाणी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 16:38 IST

डोंबिवलीतील पी अँड टी कॉलनी परिसरातील पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्रस्त रहिवाश्यांनी टँकरचे नको तर घरातील नळाला पाणी द्या असा पवित्रा घेत खासदार श्रीकांत शिंदेंची ठाण्यात भेट घेतली. शिंदेंनीही यासंदर्भातील व्यथा माहिती असून तात्काळ महापौर राजेंद्र देवळेकरांशी चर्चा केली. पाण्याची समस्या सोडवा, टँकर वाढवा अशा सूचनाही दिल्या.

ठळक मुद्देरहिवाश्यांनी घेतली खासदार श्रीकांत शिंदेंची भेटगंगा सोसायटीमधील रहिवासी ज्ञानेश्वर गाईगोळे

डोंबिवली: येथिल पी अँड टी कॉलनी परिसरातील पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्रस्त रहिवाश्यांनी टँकरचे नको तर घरातील नळाला पाणी द्या असा पवित्रा घेत खासदार श्रीकांत शिंदेंची ठाण्यात भेट घेतली. शिंदेंनीही यासंदर्भातील व्यथा माहिती असून तात्काळ महापौर राजेंद्र देवळेकरांशी चर्चा केली. पाण्याची समस्या सोडवा, टँकर वाढवा अशा सूचनाही दिल्या.त्या भागातील गंगा सोसायटीमधील रहिवासी ज्ञानेश्वर गाईगोळे यांनी खासदार शिंदेंची भेट घेत त्यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली. त्यावेळी शिंदेंनी ग्रामिण भागातील पाण्याच्या प्रश्नासंदर्भात विविध स्तरावर प्रयत्न सुरु आहेत, लवकरच ती समस्या सुटेल. खासदार शिंदेंनी मध्यंतरी पाण्याच्या समस्येसाठी या ठिकाणचा पाहणी दौरा केला होता. त्याचवेळी जेथे समस्या आहेत त्या ठिकणी मुबलक पाण्याचे टँकर पुरवले जावेत अशा सूचना महापौर देवळेकर, सभागृह नेते राजेश मोरेंसह महापालिका प्रशासन अधिकारी, पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी आदींना दिले होते. त्यानूसार आठवड्याला टँकर दोन-तीन वेळा टँकर मिळतात, पण त्याने काही भागत नाही, असे गाईगोळे म्हणाले. त्यामुळे नळाला पाणी हवे अशी मागणी त्यांनी केली. पाणी नसल्याने येथिल हजारो नागरिक त्रस्त असून दाद कोणाकडे मागायची असा सवालही त्यांनी केला.खासदार शिंदेंनी तत्परता दाखवत तातडीने महापौर देवळेकरांशी संवाद साधला. त्यावर त्यांनीही त्या भागाची पाहणी करतो, तसेच पाणी पुरवठा विभागाकडून नेमक्या समस्येची माहिती घेतो, जास्तीचे टँकर त्या ठिकाणी कसे जातील याबाबत चर्चा करतो अशी चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. शुक्रवारी ईद असल्याने महापालिका कार्यालय बंद होते, परिणामी गाईगोळे यांची महापौरांसमेवत भेट झाली नसून शनिवारी महापौर देवळेकरांनी भेटायला बोलावल्याचे सांगण्यात आले.============

टॅग्स :dombivaliडोंबिवलीthakurliठाकुर्लीkalyanकल्याणkdmcकल्याण डोंबिवली महापालिका