शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

सदाबहार येऊर ठरतेय पर्यटकांचे आकर्षण!

By admin | Updated: May 22, 2017 01:59 IST

ठा णे शहरापासून अवघ्या तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेला येऊरचा हा रम्य परिसर शिवाईनगर आणि उपवन या भागाला लागूनच आहे

- जितेंद्र कालेकर, ठाणेठा णे शहरापासून अवघ्या तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेला येऊरचा हा रम्य परिसर शिवाईनगर आणि उपवन या भागाला लागूनच आहे. जैववैविधतेने नटलेल्या या जंगल भागात वन्य प्राणी, पक्षी आणि दुर्मिळ वनस्पतींचे वैभव आहे. पर्यटन आणि पे्रक्षणीय शांत निसर्गरम्य ठिकाण असल्यामुळे येऊर हे आदिवासींपासून धनदांडग्यांचेही आकर्षण ठरले आहे. जंगलाच्या मधोमधच वनविभागाला लागून येऊर आणि चेन्ना ही दोन महसुली गावे आहेत. या गावाचा परिसर हा ठाणे महापालिकेच्या क्षेत्रात येत असल्याचा तसेच आदिवासींच्या अशिक्षितपणाचा फायदा घेत या परिसरात अनेक श्रीमंतांनी त्यांच्या जागा बळकावून त्याठिकाणी अलिशान बंगले उभारले. या परिसरात सर्व सुविधा असलेले असे सुमारे ३०० बंगले आणि हॉटेल्स आहेत. त्यातील बऱ्याच अनधिकृत बंगल्यावर ठाणे महापालिका आणि वनविभागाने कारवाई केली आहे. आदिवासींच्या जागा ९९ वर्षांच्या लीजवर घेतल्या आहेत. तर काहींनी फसवणुकीने जादा पैशाचे आमिष दाखवत खरेदी केल्या आहेत. त्यामुळे पर्यटनापेक्षा रात्रीच्या पाटर्या, लग्न समारंभानिमित्त होणारे हळदीचे कार्यक्रम तसेच वेगवेगळया निमित्ताने होणाऱ्या पाटर्यांसाठीच येऊरची ओळख अधोरेखित होऊ लागली. दोन वर्षांपूर्वी तर एका वाढदिवसाच्या कार्यक्रमातच गोळीबाराची घटना घडली होती. त्यानंतर पोलीस, वनविभाग आणि राज्य उत्पादन शुल्क खडबडून जागे झाले. याठिकाणी जाण्यासाठी अनेक निर्बंध आणले. मूळात, येऊरचे जंगल हे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या क्षेत्रात येत असल्यामुळे त्याची राखीव वनक्षेत्रात गणना होते. तिथे असणाऱ्या वन्यप्राणी आणि पक्षांना मुक्त संचार करता यावा म्हणून सायंकाळनंतर त्याठिकाणी आवाजाला आणि नागरिकांना वावरण्यासाठी आधीच बंदी आहे. त्यात अनेक गैर प्रकार वाढल्यामुळे वनविभागाने अनेक अतिक्रमणे हटवली. शिवाय, ३१ डिसेंबर, गटारी आणि होळीनिमित्त रंगणाऱ्या ओल्या पाटर्यांवर निर्बंध आली आहेत. रात्रीच्यावेळी येथील जंगलात बिबटयासह अनेक वन्य प्राण्यांचा मुक्त संचार सुरु असतो. इथे रंगणाऱ्या पाटर्यां, वाहनांच्या हॉर्नमुळे आणि डीजेमुळे होणारे कर्णकर्कश आवाज तसेच धांगडधिंग्यामुळे वन्यप्राण्यांना मात्र त्रास होतो. त्यांच्या आरोग्यावरही विपरित परिणाम होतो. येऊरच्या प्रवेशद्वारावरच वाहनांची तपासणी करूनच आत प्रवेश दिला जातो. अनधिकृतपणे प्रवेश करणाऱ्यांकडून नुकसानभरपाई तसेच पाचशे ते पाच हजारापर्यंतचा दंडही वनविभागाकडून वसूल केला जातो. मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांवरही याठिकाणी कारवाई केली जाते. येऊर गावातील रहिवासी वगळून अन्य पर्यटक किंवा नागरिकांना शुल्क आकारूनच सकाळी ७ ते सायंकाळी ६ या दरम्यान प्रवेश दिला जातो. रात्री ११ नंतर मात्र पर्यटकांनाही आत सोडले जात नाही. या परिसरात नवीन बांधकामांना परवानगी नाही. त्यामुळे वनक्षेत्रापासून १०० मीटरच्या आत बांधकामास राष्ट्रीय हरित लवादाची परवानगी आवश्यक केली आहे. येथील वनसंपदा टिकून राहण्यासाठी हे निर्बंध हे रहिवासी मान्य करतात. वनसंपदा टिकून राहण्यासाठी पर्यटक आणि नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण झाली पाहिजे, अशी माफक अपेक्षा निसर्गप्रेमींनी व्यक्त केली आहे.‘ओडीके’ आणि नवरंग येऊरचे पाहुणे...येऊरच्या या जंगलात दक्षिण भारतातून ओरियंटा द्वारफ किंगफिश (ओडीके) हा पाहुणा पक्षी खास प्रजननासाठी येतो. साधारण जूनमध्ये त्याचे आगमन होते. सप्टेंबर मध्ये आपल्या पिलांसह तो परत जातो.पिक्टा अर्थात नवरंग हा पक्षीही मध्यप्रदेशातून केवळ उन्हाळयाच्या हंगामात येतो. साधारण, एप्रिल मध्ये येणारा हा नवरंग येऊरचा पाहूणचार घेतल्यानंतर जून, जुलै मध्ये आपल्या मुळ ठिकाणी जातो.बिबटयांचा मुक्त वावर...१बिबटया हा अत्यंत गुढ वर्तन असलेला प्राणी. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात अन्न साखळीमध्ये तो उच्चस्थानी आहे. हे उद्यान मानवी वस्तीतलगत असूनही मानव आणि प्राणी संघर्ष अल्प प्रमाणात आहे. २स्वयंसेवी संस्था आणि वनविभागामार्फत बिबटयापासून संरक्षण कसे करावे, याबाबत वेगवेगळया प्रकारे जनजागृती मोहीम राबविली जात असल्याचे वनअधिकारी सांगतात. सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी (सायंकाळी ६ ते पहाटे ५ पर्यंत ) त्याच्या हालचाली मोठया प्रमाणात असल्याचे आढळते. ३या काळात स्थानिक रहिवाशांनी आणि पर्यटकांनी बाहेर जाणे टाळावे. बिबटया हा त्याच्या उंचीचे सावज हेरतो. त्यामुळे शौचालयाला उघडयावर जाऊ नये. तसेच लहान मुलांना बाहेर पाठवू नये, असे आवाहन वनविभागातर्फे करण्यात येते. त्याचा उपयोग होऊ लागला आहे.