शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील पर्यटकांची ‘टूर-टूर’ सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2020 00:53 IST

ठाणेकरांची गोवा, महाबळेश्वरला पसंती

कोरोनामुळे सात ते आठ महिन्यांपासून घरात बसलेल्या नागरिकांनी दिवाळीच्या सुटीत नियमांचे पालन करत बाहेर जाण्याचा बेत आखला. लाॅकडाऊनमुळे जवळपास सहा, सात महिने घरात अडकून पडलेल्या पर्यटकांसाठी अनलाॅक आणि दिवाळीची सुटी म्हणजे दुग्धशर्करा योगच झाला. या सुटीत विविध शहरांंतील पर्यटक नेमके कुठे गेले, कोणत्या पर्यटनस्थळांना पसंती दिली,  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कशी खबरदारी घेतली,  याचा  ‘लोकमत’ने घेतलेला हा आढावा...

n  अजित मांडकेलोकमत न्यूज नेटवर्कठाणे : अनलॉकपासून हळूहळू सर्व व्यवहार सुरळीत होत आहेत. परंतु, नागरिकांच्या मनात आजही भीती कायम आहे. असे असतानाही दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये १५ टक्के लोकांनीच काही पर्यटनस्थळांना किंवा पिकनिक स्पॉटला भेटी दिल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये अनेकांची पहिली पसंती ही कोकण तसेच गोवा, त्यानंतर थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वरला आणि लोणावळ्याला दिली आहे. अलिबागला पाच टक्के पर्यटकांनी पसंती दर्शविली आहे.

अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर पर्यटनस्थळेही खुली झाली. परंतु, फिरण्यास जाणाऱ्या नागरिकांच्या मनात कोरोनाची भीती कायम आहे. त्यामुळेच आजही दिवाळीची सुट्टी असतानाही ज्या ठिकाणी कोरोनाची भीती नाही, अशा ठिकाणी फिरण्यास ठाणेकरांनी पसंती दिली आहे. यासाठी गुगल सर्च करण्यात आले. कुठे काय परिस्थिती आहे, फिरण्यास गेल्यावर धोका तर नाही ना, या सर्वांची खातरजमा करून पर्यटकांनी पर्यटनस्थळ निवडले. १० टक्के ठाणेकर पर्यटकांनी गोवा, किंबहुना कोकणला पसंती दिल्याची माहिती ट्रॅव्हल्स व्यावसायिकांनी दिली आहे. त्या खालोखाल महाबळेश्वरलाही पसंती दिली आहे. 

मागील वर्षीसारखी यंदा परिस्थिती नाही. पर्यटकांनीही फारसे कुठे जाण्यास पसंती दिलेली नाही. त्यातही जे काही १० ते १५ टक्के पर्यटक बाहेर पडले त्यांनी गोवा, महाबळेश्वर आणि     लोणावळ्याला पसंती दिली आहे.    - शैलेश बोरनारे, व्यावसायिक

येऊरचे बंगलेही फुल्लठाण्यातील थंड हवेचे, किंबहुना एकही कोरोना रुग्ण न आढळल्याचे ठिकाण म्हणजे येऊरची ओळख झाली आहे. दिवाळीतही शनिवारी आणि रविवारी खवय्यांबरोबर येथे असलेल्या बंगल्यांवर पर्यटकांची गर्दी झाल्याचे दिसून आले. येथील बंगले फुल्ल झाल्याचे दिसून आले.

यंदा दिवाळीच्या सुट्टीत कोकण वगळता इतर कोणत्याही ठिकाणाला पर्यटकांनी पसंती दिलेली नाही. त्यातही यंदा फिरण्यास जाणाऱ्यांचे प्रमाण नगण्यच राहिले आहे.    - विकास शेलार, व्यावसायिक

 

 

टॅग्स :Mahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थानRaigadरायगड