शहरं
Join us  
Trending Stories
1
जपानच्या संसदेचा ऐतिहासिक निर्णय! सनाई ताकाईची बनल्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान
2
'स्वत:ला सरकार समजू नका'; मेधा कुलकर्णींच्या 'शुद्धीकरणा'मुळे महायुतीत फूट; मित्रपक्षांकडून 'धार्मिक तेढ' वाढवल्याचा आरोप
3
पाकिस्तान-अफगाणिस्तान शस्त्रसंधी संकटात! एका ओळीवर अवलंबून, पाक संरक्षण मंत्र्यांचं मोठं विधान
4
Muhurat Trading: शेअर बाजारात आज फक्त १ तास! जाणून घ्या 'मुहूर्त ट्रेडिंग'ची अचूक वेळ 
5
बुद्धिबळ जगताला मोठा धक्का! अमेरिकेचा 'ग्रँडमास्टर' डॅनियल नरोडित्स्की याचे २९ व्या वर्षी निधन
6
टोल कंपनीने ११०० रुपये बोनस दिला; टोल प्लाझावरील कर्मचाऱ्यांनी असा बदला घेतला, १० हजार गाड्या फ्रीमध्ये सोडल्या...
7
नवी मुंबईत अग्नितांडव! वाशीतील आगीत ६ वर्षांच्या मुलीसह ४ जणांचा मृत्यू, १० जण जखमी
8
असरानी यांच्या निधनानंतर अक्षय कुमार भावुक; म्हणाला, "दोन आठवड्यांपूर्वीच..."
9
२०४७ पर्यंतचा विकासाचा रोडमॅप, व्हिजन डॉक्युमेंटचा मसुदा मंजूर, CM फडणवीस स्वतः घेणार आढावा
10
नवी मुंबईत भीषण आगीत होरपळून माय-लेकीचा मृत्यू; सिलिंडर स्फोटानंतर इतर बाहेर पडले पण दोघी अडकल्या
11
आजचे राशीभविष्य २१ ऑक्टोबर २०२५ : धनप्राप्ती होईल, लक्ष्मी पुजनाच्या दिवशी कोणाच्या राशीत काय लिहिलेय...
12
लष्करातील समन्वयामुळे पाकिस्तानने गुडघे टेकले; PM मोदी यांचे भारतीय सैन्याबद्दल कौतुकोद्गार
13
रात्री पार्टी, बहिणीला व्हिडीओ कॉल अन् पहाटे पत्नीचा मृत्यू; मृतदेह सोडून विधानसभा अध्यक्षांचा पुतण्या फरार
14
भारत नक्षलवादाच्या समूळ उच्चाटनाच्या उंबरठ्यावर; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास
15
आता उद्धव ठाकरे म्हणाले... मी पुन्हा येईन, महापालिकेवर भगवा फडकवीन; मतांची चोरी पकडली
16
'हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं'... डायलॉग अजरामर करणारे अभिनेते असरानी कालवश
17
महसूलमधील ‘पदोन्नती’चा अनुशेष तीन महिन्यांत भरणार; ४७ अधिकाऱ्यांना पदोन्नतीची दिवाळी भेट
18
महाराष्ट्र देशात अव्वल; पण ‘माहितीचा अधिकार’ अधांतरी, चार लाखांहून अधिक अपिले रखडली
19
बिहार निवडणूक २०२५: काँग्रेसची विचित्र स्थिती, उमेदवारी वाटपात गोंधळ; जुनी पोस्ट व्हायरल, अन्…
20
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिली पुन्हा धमकी; रशियाकडून तेल आयात थांबवा अन्यथा...

पावसाच्या दमदार हजेरीने लोकांची तारांबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 00:47 IST

मंगळवारी रात्रभरात १६९ मिमी पाऊस : झाडे उन्मळून पडली, ठिकठिकाणी झाली वाहतूककोंडी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : मागील काही दिवसापासून पावसाचा जोर ओसरला होता. मात्र मंगळवारी रात्रीपासून पावसाने दमदार हजेरी लावली. सकाळी ८ वाजेपर्यंत शहरात १६९ मिमी पावसाची नोंद झाली तर बुधवारी दिवसभर पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ४३ मिमी पाऊस झाला. पावसामुळे शहरातील ठिकठिकाणी पाणी साचले, तीन ठिकाणी वृक्ष तर मुंब्य्रात एका घराची भिंत कोसळण्याची घटना घडली. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.

गेल्या काही दिवसापासून पावसाचा जोर कमी झाला होता. सांयकाळच्या सुमारास पावसाच्या तुरळक सरी बरसत होत्या. परंतु हवामान खात्याने २१ आणि २२ सप्टेंबर रोजी पाऊस बरसणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. २२ तारखेला रात्री साडेदहाच्या सुमारास शहरात पाऊस बरसण्यास सुरवात झाली. सुरुवातीला हलक्या सरी बरसत होत्या. मात्र रात्री १२ नंतर पावसाने दमदार हजेरी लावली. रात्री ११.३० ते १२.३० या एका तासात ४५.४७ मिमी पावसाची नोंद झाली. मध्यरात्री १ ते २.३० या काळात ४१.१५ मिमी पाऊस पडला. पहाटे साडेतीननंतर पावसाचा जोर काहीसा कमी झाला. पहाटे ५.३० ते ६.३० या कालावधीत केवळ ५.५९ मिमी पावसाची नोंद झाली. सकाळी ८.३० पर्यंत १६९.१८ मिमी पावसाची नोंद झाली.

बुधवारी दिवसभर अनेक शहरांत सूर्यदर्शन झाले नव्हते. ढगाळ वातावरण व पावसाच्या सरी कोसळत होत्या. संध्याकाळी साडेपाचपर्यंत ४३ मिमी पावसाची नोंद झाली. आतापर्यंत ठाणे शहरात ३५९९ मिमी पाऊस झाला असून मागील वर्षी आजच्या तारखेपर्यंत ४३१९.९१ मिमी पाऊस झाला होता. मंगळवारीरात्री पडलेल्या पावसामुळे कळवा स्टेशन जवळील ‘सत्यम शिवम सुदंरम’ इमारतीच्या परिसरात पाणी साचले होते. चिखलवाडी, नौपाडा, राजहंस सोसायटी कळवा, जगदाळे वाडी कोपरी, सिध्दार्थ नगर कोपरी, गणपती मंदिर कोळीवाडा आदी भागात पाणी साचल्याच्या घटना घडल्या. येथील अनेकांच्या घरात पाणी शिरले होते, पाणी वाहून जाण्यासाठी बांधलेल्या गटारे तुडूंब भरली होती. त्यामुळे पावसाळ््यापूर्वी नालेसफाई केली की, नाही, असा प्रश्न केला जात आहे. मुंब्य्रात एका घराची भिंत कोसळल्याची घटना घडली. तीन ठिकाणी वृक्ष कोसळले. यामध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नाही.बुधवारी सांयकाळी समुद्राला भरती असल्याने ४.०८ मीटर उंच लाटा उसळणार होत्या.ठाण्यात ठिकठिकाणी साचले पाणी : मुसळधार पावसामुळे बुधवारी शहरात ठिकठिकाणी पाणी साचून वाहनधारकांची प्रचंड गैरसोय झाली. पाणी तुंबल्याचे प्रकार शहरात जवळपास दहा ठिकाणी झाले. धोधो पाऊस आल्याने पुरेशा प्रमाणात पाण्याचा निचरा होऊ शकला नाही. परिणामी पाणी रस्त्यांवर तुंबले. त्यामुळे ठिकठिकाणी वाहतूककोंडीही झाली. ठाण्यात पाणी तुंबणार नाही, असा दावा दरवर्षी पालिकेकडून केला जातो. मात्र दरवर्षी हा दावा फोल असल्याचे सिद्ध होते. कोरोना काळातही लोकांकडून कराची अपेक्षा करणाऱ्या महानगरपालिकेने अशा मुलभूत समस्यांपासून लोकांना दिलासा द्यावा, अशी मागणी यापार्श्वभूमीवर होत आहे.पावसाने उभेपीक केले उद्ध्वस्त... अंबरनाथ तालुक्यातील ग्रामीण भागात दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसाने भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मांगरूळ, शिरवली आदी ग्रामीण भागात बहरून आलेले भातपीक कापणीच्या आधीच पावसाने पडल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.