शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

दरवाढीमुळे टोमॅटो झाले लालबुंद!

By admin | Updated: July 6, 2017 06:18 IST

पुरेसा पाऊस नसल्याने नव्या भाज्यांची आवद मंदावल्याने ठाणे, डोंबिवलीच्या बाजारपेठांत गेल्या आठवडाभरात भाज्यांचे दर कडाडले

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : पुरेसा पाऊस नसल्याने नव्या भाज्यांची आवद मंदावल्याने ठाणे, डोंबिवलीच्या बाजारपेठांत गेल्या आठवडाभरात भाज्यांचे दर कडाडले असून त्यातील टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत. पंधरवड्यापूर्वी २० ते ३० रुपये किलो दराने मिळणाऱ्या टोमॅटोचे दर ८० रूपये किलोवर गेले आहेत. टोमॅटोबरोबरच कोथिंबीर, फ्लॉवर, मिरची, वांगी या भाज्याही महागड्या टोपलीत बसल्या आहेत. गेल्या आठवडाभरात मंडईत येणाऱ्या भाज्यांची आवक घटली आहे. परिणामी, दर वाढत गेले आहेत. अनेक भाज्या ८० रुपयांच्या पुढेच आहेत. आठवडाभरापूर्वी स्वस्त दरात मिळणारा टोमॅटो अचानक महाग होत गेल्याने महिलांमध्ये नाराजीचा सूर आहे. भाज्यांमधील अविभाज्य घटक म्हणून टोमॅटोकडे पाहिले जाते. परंतु त्यांच्या दराने तोंडचे पाणी पळवल्याची महिलांची भावना आहे. मिरचीचे दर देखील दुपटीने वाढले आहेत. कोथिंबिरीच्या मोठ्या जुडीने दरातच शतक ओलांडले आहे. फ्लॉवर, वांगीही महाग झाले असून वाटाणा तर अडीचशे रुपये किलोवर पोचला आहे. गेल्या पाच ते सहा दिवसांत पावसाचा जोर वाढल्याने भाज्या कमी प्रमाणात येत आहे. त्यामुळे दर वाढल्याचे भाजी विक्रेते गणेश गायकवाड यांनी सांगितले. हे दर दोन आठवड्यांनी घसरतील, अशी शक्यताही त्यांनी वर्तवली आहे. वाढत्या दरामुळे स्वाभाविकपणे खरेदीही घटली आहे. जास्तीत जास्त पाव किलो भाजी खरेदी केली जात असल्याचे निरीक्षण विक्रेत्यांनी नोंदवले.