शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्यांचा आज धडक मोर्चा

By admin | Updated: June 20, 2016 02:09 IST

मीरा भार्इंदर महापालिकेने सुरू केलेल्या रस्ता रुंदीकरणात कोणताही मोबदला न देताच मनमानीपणे सुरू असलेल्या कारवाईच्या निषेधार्थ शहरातील विविध व्यापारी संघटनांनी मीरा

मीरा रोड : मीरा भार्इंदर महापालिकेने सुरू केलेल्या रस्ता रुंदीकरणात कोणताही मोबदला न देताच मनमानीपणे सुरू असलेल्या कारवाईच्या निषेधार्थ शहरातील विविध व्यापारी संघटनांनी मीरा भार्इंदर बचाव समिती स्थापन केली आहे. समितीच्यावतीने महापालिकेवर सोमवारी मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मनसे यांनी पाठींबा दिल्याने भाजपाच्या गोटात खळबळ उडाली आहे. मोर्चा टाळण्यासाठी आयुक्त व भाजपाची धडपड सुरु झाली आहे. त्यासाठी आयुक्तांनी शुक्रवारी बैठक घेऊन टीडीआर तुमच्या सहमती शिवाय देणार नाही असा प्रस्ताव पुढे ठेवला तरीही मोर्चा काढण्याचा निर्णय अद्याप कायम ठेवला आहे.मीरा भार्इंदर महापालिकेने शहरात रस्ता रुंदीकरण करताना हुकुमशाही पध्दतीने तोडली जात असल्याचा आरोप यापूर्वीच विविध राजकीय नेत्यांनी केला आहे. नागरिकांचे पुनर्वसन व त्यांना मोबदला न देताच पालिकेने बेघर करु नये अशी या सर्वांची मागणी होती. ज्या ठिकाणी वर्दळ नाही अशा भागातील औद्योगिक गाळेही पालिकेने दमदाटी करुन तोडायला लावल्याने व्यापाऱ्यांमध्ये भाजपाविरोधात संताप व्यक्त होत आहे. अर्धवट तुटलेले बांधकाम दुरुस्त करण्यासाठी दोन ते पाच लाखांचा भूर्दंड प्रत्येकाला सहन करावा लागला आहे. शिवाय उद्योग बंद ठेवावे लागल्याने नुकसान झाले. उद्योग हटवून मोक्याच्या जमिनी बांधकामांसाठी खुल्या करणे तसेच टिडीआर मिळवण्यासाठी हा सर्व खटाटोप सुरु असल्याचा आरोप होऊ लागला आहे. या असंतोषातूनच व्यापारी व उद्योजकांच्या संघटनांनी मीरा भार्इंदर बचाव समिती स्थापन करुन ‘मीरा भार्इंदर वाचवा’ अशी हाक देत सोमवारी गोडदेव नाक्याहून सकाळी साडे दहा वाजता पालिका मुख्यालयावर मोर्चा काढण्याचे जाहीर केले आहे. ज्यांची बांधकामे तोडली त्यांना मोबदला मिळावा, मनमानीपणे चाललेले तोडकाम थांबवावे आदी प्रमुख मागण्या आहेत. मीरा भार्इंदर स्मॉलस्केल इंडस्ट्रीज असोसिएशन, महाराष्ट्र स्टील बफिंग असोसिएशन सह किराणा, कटलरी, मार्बल, माथाडी या संघटना सहभागी होणार आहेत. मीरा भार्इंदर रहिवासी संघ ही समिती देखील यात सहभागी होणार आहे. विशेष म्हणजे यातील विविध व्यापारी संघटना वा त्यांचे पदाधिकारी हे भाजपाशी संबंधित आहेत. (प्रतिनिधी)