शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

कोकण पदवीधरचा आज फैसला, तीनही उमेदवारांचा विजयाचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 02:01 IST

कोकण पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीचा उद्या (गुरुवारी) निकाल जाहीर होणार

ठाणे : कोकण पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीचा उद्या (गुरुवारी) निकाल जाहीर होणार असून विधान परिषदेवर या मतदारसंघातून कोण प्रतिनिधीत्व करणार, याचा फैसला होणार आहे. या मतदारसंघात ७३.८९ टक्के मतदान झाले असल्याने ही निवडणूक चुरशीची झाली आहे.  आरोप-प्रत्यारोप, सोशल मीडियावरील प्रचार यामुळे कोकण पदवीधरच्या निवडणुकीकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे. मागील वेळेपेक्षा तब्बल २१ टक्के जास्त मतदान झाले असल्याने मतमोजणी होऊन निकाल जाहीर होण्यास अधिक वेळ लागणार हे तर उघड आहेच. मात्र हे वाढीव मतदान कोणता चमत्कार घडवणार, याची उत्सुकता आहे. वाढलेल्या मतांचा फायदा आम्हालाचा होणार, असा दावा तीनही प्रमुख पक्षातील उमेदवारांनी केला आहे.निवडणुकीत डावखरे साहेबांच्या सहकाºयांनी भाजपाच्या वरिष्ठ मंडळींनी, विविध संघटनांनी प्रत्येक मतदाराबरोबर संपर्क साधला होता. शिवाय या मतदारसंघाचा मी यापूर्वी आमदार राहिलो असल्याने अनेकांनी चांगले सहकार्य केले. त्यामुळे मतदानाचा टक्का वाढला आहे. मतदारसंघात केलेल्या कामाची पोचपावती मला मतदार देतील, अशी आशा आहे.- निरंजन डावखरे, उमेदवार, भाजपापालघरप्रमाणे शिवसेनेने ही निवडणूक प्रथमच लढवली आहे. या मतदारसंघात शिवसेनेचे खासदार, आमदार, नगरसेवक आदींची संख्या अधिक आहे. पदवीधरांचे प्रश्न, सोडवण्यासाठी शिवसेनेकडून यापूर्वी प्रयत्न झालेले आहेत. आदित्य ठाकरे तसेच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष केंद्रीत केल्याने मतदार कौल देतील अशी आशा आहे.- संजय मोरे, उमेदवार, शिवसेनासरकारच्या कामाबाबत कमालीची नाराजी आहे. त्यामुळे ही निवडणूक त्या सरकारांवर नाराजी व्यक्त करण्याचे माध्यम आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी माझ्यावर टाकलेला विश्वास तसेच राष्टÑवादीसह शेकाप आणि आघाडीच्या इतर पक्षाच्या पदाधिकाºयांनी सहकार्य केल्यानेच मतदानाचा टक्का वाढला आहे. सेना आणि भाजपावर नाराज असल्याचा फायदा आम्हालांच होईल.- नजीब मुल्ला, उमेदवार, राष्टÑवादी