शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

‘बंडोबा’ गाजवणार आजचा दिवस

By admin | Updated: February 3, 2017 03:29 IST

पालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या, (शुक्रवार) अखेरचा दिवस असल्याने बंडखोरांची पळापळ वेगात सुरू आहे. काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक नारायण

ठाणे : पालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या, (शुक्रवार) अखेरचा दिवस असल्याने बंडखोरांची पळापळ वेगात सुरू आहे. काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक नारायण पवार यांनी गुरुवारी भाजपात प्रवेश केला, तर चार महिन्यांपूर्वी काँग्रेसमधून भाजपात दाखल झालेले माजी नगरसेवक संजय घाडीगावकर आणि नगरसेविका स्वाती देशमुख यांनी अचानक भाजपाला सोडचिठ्ठी दिली आणि अपक्ष लढण्याचा निर्धार केला. लागलीच त्यांना लाल गालिचे अंथरण्यास मनसे सज्ज झाली आहे.उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत शुक्रवारी संपते आहे. मात्र, अजून कुठल्याही पक्षाने उमेदवारांच्या अधिकृत याद्या जाहीर केलेल्या नाहीत. व्हॉट्सअ‍ॅपवर दिवसभर वेगवेगळ्या पक्षांच्या याद्या फिरत होत्या. मात्र, त्याला ना कुणी दुजोरा दिला, ना त्या नाकारल्या. अर्थात, कुणाचा पत्ता कापला आणि कुणाचे नशीब फुलले, या चर्चांना ऊत आला आहे. यामुळे बंडखोरीसाठी अनेक जण सज्ज आहेत. त्यातच, सावधगिरीचा उपाय म्हणून सर्वच पक्षांनी सर्वच इच्छुकांना आॅनलाइन अर्ज दाखल करण्यास सांगितल्याने अनेकांचे अर्ज दाखल आहेत. त्यांना केवळ त्याची प्रिंट काढून आयोगाला सादर करायची आहे. समजा, पक्षाचा ‘ए-बी’ फॉर्म मिळाला नाही, तर अपक्ष किंवा अन्य पक्षांकडून लढण्यास अनेक जण तयार आहेत. या पार्श्वभूमीवर अलीकडेच काँग्रेसमधून भाजपात आलेल्या घाडीगावकर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देताना भाजपाचे स्थानिक नेते राजकीय व आर्थिक हितसंबंध जोपासत असल्याचा आरोप केला. काँग्रेसचे नारायण पवार भाजपात प्रवेश करणार, अशी चर्चा दीर्घकाळ सुरू होती. त्यांनी गुरुवारी प्रवेश केला. भाजपाच्या फुटलेल्या यादीत कळव्याचे उमेश पाटील यांचे नाव आहे. मात्र, ते शिवसेनेत आहेत. (प्रतिनिधी)