शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासीपाड्यांत आज आंतरराष्ट्रीय आदिवासी दिन

By admin | Updated: August 9, 2016 02:22 IST

संयुक्त राष्ट्र संघाने (युनो) दरवर्षी ९ आॅगस्ट हा ‘जागतिक विश्व आदिवासी दिवस’ म्हणून जाहीर केला आहे.

ठाणे : संयुक्त राष्ट्र संघाने (युनो) दरवर्षी ९ आॅगस्ट हा ‘जागतिक विश्व आदिवासी दिवस’ म्हणून जाहीर केला आहे. या आंतरराष्ट्रीय दिनाचे औचित्य साधून ठाणे शहरासह येऊर जंगलातील आदिवासीपाड्यांमध्ये मोटारसायकल रॅलीसह विविध कार्यक्रम आदिवासी बांधवांकडून साजरे केले जाणार आहेत.एकविसाव्या शतकात जग प्रवेश करत असतानासुद्धा आदिवासी जमातीची कुटुंबे आजही उपेक्षित असून गरिबी, अशिक्षित, बेरोजगारी, कुपोषण या समस्यांशी लढा देत आहेत. आदिवासी संस्कृतीवर होणारे आक्र मण व मुख्य प्रवाहाच्या नावाखाली त्यांच्या केल्या जाणाऱ्या सामिलीकरणामुळे आदिवासी संस्कृती धोक्यात आली असल्याचा आरोप आदिवासी संघटनांकडून केला जात आहे. या समस्या दूर करण्यासह हक्कांची जाणीव करून देणे आणि ते प्राप्त करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने (युनो) ९ आॅगस्ट हा आंतरराष्ट्रीय आदिवासी दिन म्हणून जाहीर केला आहे. हा आदिवासींचा गौरव दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. यानुसार, ठाणे परिसरात प्रथमच लोकमान्यनगर, येऊर, कोकणीपाडा, टकारडा, गायमुख तसेच ठाणे जिल्ह्यातील खेड्यापाड्यांमध्ये, डोंगरदऱ्यांतील वस्त्यांमध्ये या गौरव दिनाचे महत्त्व पटवून देण्यासाठी जिल्ह्यातील विविध आदिवासी संघटना पुढे आल्या आहेत.आदिवासींना या दिवसाचे महत्त्व समजावण्यासाठी ठाणे येथे संयुक्त आदिवासी उत्सव समितीचे हंसराज खेवरा, दत्ता भुयाळ यांच्या नेतृत्वाखाली मोटारसायकल रॅलीचे ठाण्यात आयोजन करण्यात येणार आहे. सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत ही रॅली खेवरा सर्कल येथून गांधीनगरमार्गे उपवन, कोकणीपाडा, वर्तकनगरमार्गे खोपट, सिव्हील हॉस्पिटल, राघोजी भांगरे चौक येथे येऊन ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ या रॅलीचा समारोप होणार आहे. या वेळी समितीद्वारे आदिवासींच्या विविध समस्या व मागण्यांचे निवेदन ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना दिले जाणार आहे.