शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

टीएमटीवर आज कुणाचा झेंडा लागणार?, ९४ उमेदवार रिंगणात; सेना-भाजपाच्या लढाईवरच नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 03:41 IST

ठाणे : १२ वर्षांनंतर लागलेल्या ठाणे परिवहन सेवेच्या टीएमटी एम्प्लॉइज युनियनच्या निवडणुकीत आता शेवटच्या टप्प्यात आरोप-प्रत्यारोप, श्रेयाची लढाई सुरू आहे.

ठाणे : १२ वर्षांनंतर लागलेल्या ठाणे परिवहन सेवेच्या टीएमटी एम्प्लॉइज युनियनच्या निवडणुकीत आता शेवटच्या टप्प्यात आरोप-प्रत्यारोप, श्रेयाची लढाई सुरू आहे. मागील २५ वर्षांत परिवहनला चांगले दिवस दिल्याचा दावा शिवसेनेकडून केला जात आहे. शिवसेनेने परिवहनचा बट्ट्याबोळ केल्याचा आरोप भाजपाने केला आहे. तिसरीकडे राष्ट्रवादीच्या पॅनलने मात्र आपला छुपा प्रचार कायम ठेवत या निवडणुकीत रंगत आणण्याचा प्रयत्न केला. परिवहनवर कोणाचा झेंडा फडकणार, हे आता शनिवारी रात्रीच निश्चित होणार आहे; परंतु या निवडणुकीत सात पदाधिकारी आणि सदस्यपदासाठी तब्बल ९४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकले आहेत.ठाणे परिवहनची सेवा १९८९ च्या सुमारास ठाणेकरांच्या सेवेसाठी सुरू झाली. त्यानंतर, स्वर्गीय आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली या परिवहन सेवेत टीएमटी एम्प्लॉइज युनियनची स्थापना करण्यात आली. ही एक मान्यताप्राप्त युनियन असून या युनियनवर १९९०-९१ च्या सुमारास धर्मवीर पॅनलने कब्जा केला होता. मधला काळ वगळता थेट १२ वर्षांनतर आता युनियनची निवडणूक लागली आहे. या निवडणुकीत सुरुवातीला शिवसेनेच्या धर्मवीर पॅनलविरुद्ध राष्टÑवादीचा शरद रावप्रणीत प्रगती पॅनल असा सामना रंगणार अशी चिन्हे होती. परंतु, अचानकपणे भाजपाच्या विकास पॅनलने या निवडणुकीत उडी घेतली आणि मतांचे विभाजन होण्यास सुरुवात झाली. विकास पॅनलने विकासाचा मुद्दा घेऊन शिवसेनेकडून झालेल्या चुकांचा पाढाच कामगारांपुढे वाचण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे, ज्या ६१३ कामगारांना कायम करण्याचे आश्वासन शिवसेना मागील कित्येक वर्षांपासून देत होती, त्याबाबतचा निर्णय भाजपाने एका फटक्यात शेवटच्या टप्प्यात आणून ठेवला आहे. दुसरीकडे शिवसेनेकडूनदेखील भाजपाचे आता केंद्राचे दाखले दिले जाऊ लागले असून त्यांच्याकडून केवळ दिशाभूलच केली जात असल्याचा आरोप होत आहे. या निवडणुकीत शिवसेनेकडून स्वत: ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, सभागृह नेते नरेश म्हस्के यांच्यासह अनेक दिग्गजांनी प्रचारात घौडदोड घेतली आहे. दुसरीकडे भाजपाच्या वतीने आमदार संजय केळकर, शिवाजी पाटील, नारायण पवार, भरत चव्हाण, कृष्णा पाटील यांनी शिवसेनेविरोधात रणशिंग फुंकले आहे.>निवडणुकीचा प्रचार शुक्रवारी सायंकाळी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीत संपला आहे. शनिवारी सकाळी ७ पासून मतदानाला सुरूवात होईल.एनकेटी महाविद्यालयात ५ पर्यंत मतदान पार पडेल. यात १८८९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.सायंकाळी६ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. पारंपरिक मतपत्रिका असल्याने रात्री १२ वाजेपर्यंत निकाल हाती येतील.

टॅग्स :thaneठाणे