शहरं
Join us  
Trending Stories
1
कुख्यात गुंड नीलेश घायवळच्या मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठीचा पैसा कुठून आला? तपास होणार!
2
जालना मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांना अटक; १० लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं!
3
एकरकमी ३७५१ पहिली उचल टाका, मगच ऊसाला कोयता; राजू शेट्टी यांनी स्पष्ट केली भूमिका
4
DIGच्या घरात सापडलं घबाड, नोटा मोजण्यासाठी मागवावी लागली मशीन, CBIची मोठी कारवाई  
5
'PM मोदी आणि ट्रम्प यांच्यात फोनवरून कसलीही चर्चा झाली नाही'; भारताने दावा फेटाळला, अमेरिकेच्या अध्यक्षांची 'पंचाईत'
6
बिहारच्या मुख्यमंत्रिपदाबाबत अमित शाहांचं सस्पेन्स वाढवणारं विधान, नितिश कुमारांबाबत म्हणाले...
7
ऑस्ट्रेलियन भूमीवर वनडेत सर्वाधिक षटकार कोणी मारले? पहिलं नाव पाहून खूश व्हाल!
8
'स्वतःच्या अपयशांसाठी शेजाऱ्यांना दोष देणे पाकिस्तानची जुनी सवय', अफगाण-पाक संघर्षावरुन भारताचे टीकास्त्र
9
कर्मचारीच द्यायचा टिप, मग फ्लिपकार्टच्या ट्रकमधील वस्तूंवर मारायचे डल्ला, ७ जण अटकेत, २२६ मोबाईल जप्त  
10
रणजी ट्रॉफी स्पर्धेत 'जर्सी' चित्रपटाचा ट्रेलर! मुंबईकरांवर भारी पडला जम्मू-काश्मीरचा ४० वर्षीय कॅप्टन
11
डीएसएलआर कॅमेऱ्याला टक्कर देणारी ओप्पो फाइंड एक्स ९ सीरीज लॉन्च; जाणून घ्या किंमत!
12
सलग दुसऱ्या सेंच्युरीसह एलिसा हीलीनं पा़डला बांगलादेशचा बुक्का; ऑस्ट्रेलियाला मिळालं सेमीचं पहिलं तिकीट
13
Gujarat Cabinet Resignation: भाजपने गुजरातमधील सर्व मंत्र्यांचे राजीनामे का घेतले, आता पुढे काय घडणार?
14
टी-२० विश्वचषक २०२६ साठी पात्र ठरलेले सर्व २० संघ कोणते? येथे पाहा संपूर्ण यादी
15
वापरली अशी ट्रिक आणि दोन वर्षे फ्रीमध्ये ऑनलाइन ऑर्डर केलं जेवण, बिंग फुटताच...   
16
"इज्जत गेली गावाची, मग आठवण आली भावाची" एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
17
कुंभमेळा आयोजनाची कामं नियोजित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत; मुख्य सचिव राजेश कुमारांचे निर्देश
18
VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
19
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी
20
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले

शिवभोजन योजनेला सुरुवात, सात केंद्रांवर आजपासून १० रुपयांची थाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2020 03:03 IST

शासन निर्णयानुसार गरीब व गरजू व्यक्तींना १० रुपयांत आहार उपलब्ध करून देण्यासाठी शिवभोजन योजना प्रायोगिक तत्त्वावर राबवली जाणार आहे.

ठाणे : शिवभोजन योजनेला प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून रविवारपासून सुरुवात होत आहे. ठाणे जिल्ह्यात सात केंद्रांवर ही योजना कार्यान्वित होणार असून याठिकाणी दररोज ६७५ थाळ्यांचे प्रायोगिक तत्त्वावर वाटप केले जाणार आहे. या थाळीचा स्वाद घेणाऱ्यांचा एक फोटो क्लिक केला जाणार असून मोबाइल नंबर घेऊन त्यावर ‘स्वाद चाखल्याबद्दल धन्यवाद,’ असा एसएमएसही पाठवण्यात येणार आहे. ठाण्यातील एका केंद्रावर या योजनेचा पालकमंत्र्यांच्या तर इतर केंद्रांवर तेथील आमदारांच्या हस्ते शुभारंभ केला जाणार असल्याने योजनेचा जास्तीतजास्त गरीब व गरजू लोकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केल्याची माहिती सूत्रांनी दिली.शासन निर्णयानुसार गरीब व गरजू व्यक्तींना १० रुपयांत आहार उपलब्ध करून देण्यासाठी शिवभोजन योजना प्रायोगिक तत्त्वावर राबवली जाणार आहे. त्यानुसार जिल्ह्याला एक हजार ३५० थाळ्यांचे टार्गेट आहे. योजनेत महिला किंवा महिला बचत गटांंना प्रामुख्याने हे काम दिले जाणार आहे. ज्या ठिकाणी हे केंद्र उभे राहणार आहे, त्याठिकाणाचे शिधावाटप विभाग, महापालिका आणि अन्न व औषध प्रशासन विभाग यांनी संयुक्तरीत्या पाहणी केली असून तेथेच केंद्र सुरू होणार आहे. जागा व शासनाच्या नियमावलीनुसार व्यवस्था आहे की नाही, याची तपासणी केली. त्यानंतर केंद्रांची निवड केली गेली आहे. यानुसार ठाणे जिल्ह्यात सात केंद्रे सुरू होत आहे. यामध्ये भिवंडीत-२, नवी मुंबई, भार्इंदर, कळवा येथे प्रत्येकी एका आणि ठाणे शहरात दोन ठिकाणांचा समावेश आहे. यातील लोकमान्य, पाडा नंबर-२ येथे पालकमंत्री तथा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.या केंद्रांवर वरण-भात, पोळी-भाजी, असे पदार्थ दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत उपलब्ध होणार आहे. सध्या हे केंद्र प्रायोगिक तत्त्वावर असून तेथील गर्दी पाहून तेथील थाळी कमी करायची किंवा वाढवायची, याचा निर्णय होणार आहे. एका केंद्रावर जास्तीतजास्त १५० आणि कमीतकमी ७५ थाळ्यांचे वाटप होणार आहे.तेराशे थाळ्यांचे जिल्ह्याला टार्गेट असल्याने त्याच्यासाठी १३ केंदे्र जिल्ह्यात उभी राहण्याची शक्यता आहे. २६ जानेवारीस सात केंदे्र सुरू होत आहेत. उर्वरित केंदे्र लवकरच सुरू होतील. या केंद्रांवर थाळीचा स्वाद घेणाऱ्यांची नोंद करण्यासाठी सॉफ्टवेअर तयार केले आहे. त्यामध्ये फोटो आणि मोबाइल नंबर घेतला जाणार असून त्याद्वारे थाळ्यांची माहिती जमा केली जाणार आहे. - नरेश वंजारी,उपनियंत्रक शिधावाटप, ‘फ’ परिमंडळ, ठाणे

टॅग्स :thaneठाणे