शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

पहिला कोरोना रुग्ण सापडल्याची आज वर्षपूर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 23:16 IST

सुरुवातीला रुग्णांवर उपचार कोणते करावेत याचीच नव्हती माहिती

अजित मांडकेलोकमत न्यूज नेटवर्कठाणे : गेल्या वर्षी  १३ मार्च रोजी ठाण्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर कोरोनाचा जो कहर सुरू झाला त्यात अनेकांचे प्राणही गेले आहेत. आज वर्ष उलटले असून सुरुवातीला सापडलेल्या रुग्णांवर उपचार कसे व कोणत्या प्रकारचे करावेत याची कोणतीही माहिती आरोग्ययंत्रणेकडे नव्हती. परंतु, आज वर्ष उलटल्यानंतर कोरोनारुग्णांची संख्या वाढत असली तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढते आहे. 

पहिला रुग्ण आढळल्यानंतर आरोग्ययंत्रणेसह जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन यांची उपाययोजनांसाठी धावपळ सुरू  झाली होती. काय करावे याचा अभ्यास सुरू होता.  यामुळे धावत्या ठाणे शहरासह संपूर्ण जिल्हा थांबला. दररोज मोठ्या प्रमाणात वाढणारे रुग्ण आणि या आजाराने होणारे मृत्यू यांच्यात होणारी वाढ. रुग्णालयांतील अपुरी पडणारी बेड्सची संख्या, रुग्णवाहिकांअभावी रस्त्यावर पडून रुग्णांची होणारी फरफट या सर्व गोष्टींना वर्ष पूर्ण होऊनही आजही ते प्रसंग आठवले की अनेकांच्या अंगावर काटा उभा राहत आहे. शासनाकडून केलेल्या उपाययोजनांमुळे काही प्रमाणात अटकाव केलेल्या कोरोनाने आता पुन्हा आपले डोके वर काढल्याने या आजाराची वर्षपूर्ती होऊनदेखील त्याची धग अजूनही कायम आहे.

औषधांचा साठा पुरेसाकोरोनाची दुसरी लाट आल्याचे सांगून तिचा सामना करण्यासाठी आरोग्ययंत्रणा सज्ज असून सर्व रुग्णालयांत पुरेसा औषधसाठा असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. तसेच पुरेसे मनुष्यबळही उपलब्ध असल्याचा दावा केला आहे. 

पहिला पॉझिटिव्ह काय करतोयपहिला पॉझिटिव्ह आज नेहमीचे आयुष्य जगत आहे. परंतु, कोरोना झाल्यानंतर जगण्यामध्ये, खाण्यापिण्यामध्ये त्याने बदल केलेले आहेत. तसेच मास्क वापर, सॅनिटायझरचा वापर आजही तो करीत आहे. तसेच सध्या कामावर जात असून, घरी आल्यानंतरही तो पूर्वीसारखीच काळजी घेत आहे.

कोविड सेंटर पुरेसेठाणे  महापालिका हद्दीत यापूर्वी महापालिकेची आणि खाजगी मिळून ३४ कोविड सेंटर सुरू होती. परंतु, मधल्या काळात रुग्णांची संख्या कमी झाल्याने यातील अनेक सेंटर बंद करण्यात आली. मात्र, आता महापालिकेचे ग्लोबल कोविड सेंटर हे एक हजार ३०० बेडचे असून, ज्युपिटर रुग्णालयाजवळ असलेले कोविड सेंटरही आता सुरू करण्यात येणार आहे. या ठिकाणी अकराशेहून अधिक बेड आहेत. तर बोरीवडे येथील कोविड सेंटरही सुरू करण्यात येत आहे. याशिवाय वेळ पडल्यास खाजगी रुग्णालयांनादेखील पुन्हा कोविड रुग्णालये म्हणून घोषित करण्याची तयारी केली आहे. चार ते पाच खाजगी रुग्णालये आजही कोविड सेंटर म्हणूनच सुरू आहेत. या सर्व ठिकाणी आजही बेड उपलब्ध आहेत.

 

टॅग्स :thaneठाणेcorona virusकोरोना वायरस बातम्या