शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण-पनवेल मार्गावर आजपासून शिवशाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 00:48 IST

ठाणे-तीनहातनाका-पवई मार्गे बोरीवली आणि ठाणे-पनवेल पाठोपाठ आता कल्याण-पनवेल या मार्गावर शिवशाही बस सोडण्याचा

ठाणे : ठाणे-तीनहातनाका-पवई मार्गे बोरीवली आणि ठाणे-पनवेल पाठोपाठ आता कल्याण-पनवेल या मार्गावर शिवशाही बस सोडण्याचा निर्णय महाराष्टÑ राज्य परिवहनच्या ठाणे विभागाने घेतला आहे. तसेच कल्याण-पनवेल या शिवशाही बसबरोबर मुलुंंड-पनवेल या नवीन मार्गावर येत्या सोमवारी एशियाड बसेस धावणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.ठाणे-बोरीवली आणि ठाणे-भार्इंदर या शिवशाही बसला ८४ आणि ८६ टक्के प्रवाशांचा प्रतिसाद लाभत आहे. त्याचबरोबर इतरही मार्गावर धावणाऱ्या शिवशाही बसेसला प्रवाशांकडून प्रतिसाद मिळत आहे. त्याचप्रमाणे कल्याण-पनवेल हा मार्गावर शिवशाही बस सुरू करावी अशी प्रवाशांकडून मागणी पुढे आली. त्यातच, यामार्गावर मोठ्याप्रमाणात उच्चभ्रू प्रवासी असल्याने सोमवारपासून कल्याण-पनवेल ही शिवशाही बस सुरू होत आहे. या मार्गावर कल्याणमधून दिवसभरात साध्या बसच्या ८६ फेºया होत आहेत. तसेच सोमवारपासून धावणाºया ३ शिवशाही बसच्या आणखी १८ फेºयांची भर पडणार आहे. शिवशाही बससाठी साध्या बसपेक्षा २० रुपये जास्त मोजावे लागणार आहेत. साध्या बसचे तिकीट ४५ रुपये असून शिवशाहीचे तिकीट ६५ रुपये असणार आहे.तसेच ठाणे एसटी विभागाने मुलूंडवरून पनवेलला जाणारी प्रवासी संख्या लक्षात घेऊन हा मार्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या मार्गावर एशियाड बस सोमवारपासून सुरू होत आहे. या ७ बस जवळपास ३० ते ३५ फेºया दिवसभरात मारणार असून ही बस मुलुंडवरून आनंदनगर जकातनाकामार्गे ऐरोली, रबाले करून पुढे पनवेल जाणार आहे. या बसचे तिकीट साधारणपणे ६० रुपये असणार आहे. या मार्गावर प्रतिसाद लाभल्यास भविष्यात शिवशाहीही बस सोडण्यात येतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.