शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आजचा दिवस भाग्याचा, सर्व युगांप्रमाणे "लता युग" अविस्मरणीय: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

By जितेंद्र कालेकर | Updated: November 19, 2023 15:30 IST

या वाटचालीत शासन कायम सोबत असेल, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात दिली.

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: भारतीय संगीताचा अमोल वारसा पुढच्या पिढीला देण्यासाठी ठाण्यातील स्व. लता मंगेशकर गुरुकुल उपयुक्त ठरेल.

या वाटचालीत शासन कायम सोबत असेल, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात दिली. ठाण्यातील वर्तकनगर येथील रेपटो क्रॉस  आरक्षित भूखंडावर भारतरत्न स्व. लता दीनानाथ मंगेशकर संगीत विद्यालय (गुरुकुल ) उभारण्याच्या कामाचा भूमीपूजन सोहळा मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते पार पडल्यानंतर डॉ. काशिनाथ घाणेकर सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते मार्गदर्शन करताना बोलत होते. ते पुढे म्हणाले,

इतर विकासकामे लवकरच पूर्ण करण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातील. ठाण्याचा सर्वांगीण विकास होतोय, अजूनही होईल. मुंबईतील सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्याचे काम सुरू केले आहे, सुशोभीकरण, स्वच्छतेकडे कटाक्षाने लक्ष दिले जात आहे. तसेच ठाण्यातही करणार आहे. जुन्या विहिरींचे पुनर्जीवन करण्याचे काम सुरू असून त्यासाठी 50 कोटी निधी दिला आहे. वापरा आणि फेका ही आपली संस्कृती नाही, जुना अनमोल ठेवा जपायला हवा, त्याचे संवर्धन करायला हवे, असंही ते यावेळी म्हणाले.

हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे ठाणे जिल्ह्यावर खूप प्रेम होते, मी त्यांच्याच आशिर्वादाने मुख्यमंत्री झालो. ग्लोबल वार्मिंगवर मात करण्यासाठी जागोजागी झाडे लावणे गरजेचे आहे. धोकादायक इमारतींचा पुनर्विकास टप्प्याटप्प्याने केले जाईल. त्यासाठी क्लस्टर जलद गतीने राबविण्यात येत आहे. सर्वांनी जबाबदारीने, झोकून देऊन काम करणे आवश्यक आहे. म्हणूनच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या साथीने जनसामान्यासाठी अहोरात्र काम करीत आहोत. अनेक बंद प्रकल्पांना पुन्हा सुरू केले, नवीन प्रकल्प सुरू केले जात आहेत. हे सर्वसामान्यांचे शासन आहे, शेवटपर्यंत त्यांच्या हितासाठीच काम केले जाईल. मूलभूत गरजा पूर्ण व्हायला हव्यात, त्यासाठी सर्व सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदे