शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

खासगीकरण ठरले टीएमटीचे मारेकरी!

By admin | Updated: December 21, 2015 01:17 IST

ठाणेकरांना चांगली सेवा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने स्वर्गीय आनंद दिघे यांनी ठाणे महापालिकेची परिवहन सेवा सुरू केली होती. ही सेवा ठाणेकरांना उत्तम सेवा देईल

ठाणेकरांना चांगली सेवा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने स्वर्गीय आनंद दिघे यांनी ठाणे महापालिकेची परिवहन सेवा सुरू केली होती. ही सेवा ठाणेकरांना उत्तम सेवा देईल, असा त्यांचा उद्देश होता. परंतु, आज ते हयात नसताना त्यांच्या या स्वप्नाला सत्ताधारी शिवसेनेसह निष्क्रिय प्रशासनाने हरताळ फासला आहे. परिवहन सेवा सक्षम करण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न झाले. परंतु, पालिकेने केलेले हे प्रयत्न परिवहन प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या आडमुठेपणामुळे असफल ठरले. त्यामुळेच २६ वर्षांनंतरही ही सेवा ठाणेकरांच्या पसंतीस उतरू शकलेली नाही.ठाणे परिवहनची सेवा १९८९ मध्ये सुरू झाली तेव्हा सेवेत प्रत्येक राजकीय पक्षातील नेत्यांच्या मर्जीतील लोकांची भरती केली गेली. अपेक्षेपेक्षा जास्त भरती केली गेली. काहींना तर कार्यशाळेचे ज्ञानही नसताना केवळ राजकीय दबावामुळे प्रवेश मिळाला. आजही ही मंडळी परिवहन सेवेत काम करीत आहेत. त्यामुळे या सेवेचे तीनतेरा वाजले. राजकीय मंडळींनी या सेवेच्या माध्यमातून आपली पोळी भाजण्याचे काम गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू ठेवले आहे.ठाणे परिवहन सेवेत आजच्या घडीला ३१३ बस असल्या तरी रस्त्यावर प्रत्यक्षात १३० च्या आसपास बस धावतात. परिवहनचे उत्पन्न कोलमडले असून प्रवाशांची संख्या कमी झाली आहे. परंतु, याला जबाबदार कोण, असा जर सवाल उपस्थित झाला तर प्रशासन आणि राजकीय मंडळी हेच जबाबदार आहेत. राजकीय राड्यामुळेच मागील तीन वर्षांपासून परिवहन समितीविनाच कारभार सुरू आहे. ही समिती सहा महिन्यांकरिता लोकशाही आघाडीच्या ताब्यात जाण्याच्या वेळेस जे राजकीय नाट्य घडले, त्यानंतर आजपर्यंत परिवहन समितीची घडी बसू शकलेली नाही. ही समिती आपल्या ताब्यातून जाऊ नये, असे सत्ताधारी शिवसेनेचे प्रयत्न आहेत. याच भीतीने ही समिती रखडली आहे.परिवहन सेवा सक्षम करण्यासाठी यापूर्वी महापालिका प्रशासनाकडून अनेक वेळा प्रयत्न झाले. परंतु, हे प्रयत्नही सपशेल अपयशी ठरले. जेएनएनयूआरएमअंतर्गत परिवहनने यापूर्वी २०० बस घेतल्या. यातील १०० हून अधिक बस आज किरकोळ दुरुस्तीसाठी परिवहनच्या आगारात धूळखात पडल्या आहेत. ज्या बसचे आयुर्मान संपुष्टात आले आहे, त्या बस रस्त्यावर उतरविल्या जात आहेत. परिवहन कर्मचाऱ्यांची थकबाकी, ठेकेदारांची रखडलेली देणी, सीएनजीची रखडलेली देणी यामुळे परिवहन सेवा आज मेटाकुटीला आली आहे. केवळ परिवहनचा पाहणी दौरा आणि अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन सेवा सुधारण्याचे आदेश दिले जातात. स्थायी, महासभेच्या माध्यमातूनदेखील अनेक वेळा परिवहन सुधारण्यासाठी आश्वासनांची खैरात केली गेली. त्याचे पुढे काय झाले, ती आश्वासने पूर्ण करण्यात अडथळे कोण आणतो, याची उत्तरे प्रशासन आणि राजकीय मंडळींनी स्वत: आरशात पाहिले तर मिळतील. जाणूनबुजून परिवहन सेवा सक्षम करायची नाही, असा विडाच राजकीय नेते व प्रशासनाने उचलला आहे.