शहरं
Join us  
Trending Stories
1
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
2
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लॅन सांगितला
3
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
4
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
5
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
6
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
7
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
8
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
9
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
10
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
11
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...
12
तो कोहलीमुळं खचला! खरंच हेच असेल का पाकचा 'बब्बर शेर' प्रत्येक मॅचमध्ये 'ढेर' होण्यामागचं कारण?
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
14
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
15
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
16
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
17
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
18
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
19
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
20
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...

टीएमटीच्या ३५ ते ४० फेऱ्या रद्द!

By admin | Updated: March 22, 2016 02:15 IST

एकीकडे खासगी बसगाड्यांवर वाहतूक नियंत्रण शाखा आणि प्रादेशिक परिवहन विभागाने कारवाईचा बडगा उगारलेला असताना दुसरीकडे ठाणे परिवहन सेवेच्या (टीएमटी) अनेक बसफेऱ्या वेगवेगळ्या

जितेंद्र कालेकर, ठाणेएकीकडे खासगी बसगाड्यांवर वाहतूक नियंत्रण शाखा आणि प्रादेशिक परिवहन विभागाने कारवाईचा बडगा उगारलेला असताना दुसरीकडे ठाणे परिवहन सेवेच्या (टीएमटी) अनेक बसफेऱ्या वेगवेगळ्या कारणास्तव रद्द करण्यात येत असल्याने प्रवाशांचे हाल सुरू आहेत.ठाणे ते शास्त्रीनगर या एकाच मार्गावरील बसच्या १५ फेऱ्या कोणतेही कारण न देता सोमवारी रद्द करण्यात आल्या. अशीच अवस्था ठाणे रेल्वेस्थानकासह अनेक बसमार्गांवर असल्याने ठाणेकर प्रवाशांमध्ये संताप व्यक्त होत आहे.सध्या ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेकडे चांगल्या स्थितीतील २५० गाड्या असल्याचे सांगण्यात येते. प्रत्यक्षात १६० गाड्याच रस्त्यावर धावतात. त्यापैकीही अनेक गाड्या या ब्रेकडाऊन झाल्याने रस्त्यातच बंद पडतात. त्यामुळे ७० ते ८० गाड्याच प्रत्यक्ष उपलब्ध होतात. एकीकडे टीएमटीला प्रवासी मिळण्यासाठी आरटीओ आणि पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून प्रयत्न होत असताना टीएमटी मात्र प्रवाशांना आवश्यक त्या सुविधा देण्यात कमकुवत ठरत आहे. अनेक बसला नव्या टायरची आवश्यकता असूनही त्यांची उपलब्धता नाही. आॅइल आणि गाड्यांच्या सुट्या भागांचाही तुटवडा असल्याची कारणे अनेक वाहक आणि चालकांनी सांगितली. सोमवारी शास्त्रीनगर ते ठाणे या मार्गावर सकाळी ८.३०, ८.३५ ते ९.४७ वाजेपर्यंतच्या नऊ गाड्या रद्द झाल्या. त्यामुळे प्रवासी, वाहक तसेच टीएमटीच्या अधिकाऱ्यांमध्ये वादावादीचे अनेक प्रकार घडले. ठाणे रेल्वे स्थानकात ‘धर्माचापाडा’ या मार्गावर जाण्यासाठी पहाटे ४.३० वाजता बस घेण्यासाठी आलेल्या चालकाला ९ पर्यंत गाडीच मिळाली नाही. ठाणे रेल्वे स्थानक ते टिकुजिनीवाडी सकाळी ६.३० ते १० पर्यंत अवघी एकच गाडी सोडण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वागळे इस्टेट आगारातून १७८ पैकी १३० तर कळवा आगारातून ६४ पैकी अवघ्या ३० गाड्या बाहेर पडल्या. बसेस उपलब्ध होत नसल्यामुळे प्रवाशांचे तर हाल होतात. शिवाय, टीएमटीलाही रोज लाखो रुपयांचा फटका बसत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.