शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

टीएमटीचे तिकीट दर कमी करण्याच्या हालचालींना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 23:36 IST

वार्षिक ५५ कोटींचा फटका : शिवसेनेचे परिवहनला पत्र, बेस्टचे अनुकरण

ठाणे : बेस्टने तिकीट दरात कपात केल्यानंतर आता ठाणे परिवहन सेवेचे तिकीट दर कमी करण्यासाठी शिवसेनेसह प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. तिकीट दर कमी केले तर त्याचा फटका परिवहनला बसणार असून दिवसाला तब्बल १२ ते १५ लाखांचे आर्थिक नुकसान होणार असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.

बेस्टमार्फत प्रवासी वाढविण्याच्या दृष्टीने मंगळवार पासून तिकीट दर पाच रुपयांपासून पुढे ठेवण्यात आले आहेत. यासाठी बेस्ट उपक्रमाला वार्षिक २०० कोटींचे अनुदान मिळणार आहे. त्यामुळे आता बेस्ट प्रमाणे ठाणे महापालिकेतसुद्धा परिवहन सेवेच्या तिकीट दरात कपात करण्यासाठी शिवसेनेने हालचाली सुरू केल्या आहेत. तसेच भाजपाच्या नगरसेवकाने सुद्धा महापालिका आयुक्तांना निवदेनदेवून तिकीट दरात कपात करण्याची मागणी केली आहे.

टीएमटीचे आजघडीला पहिल्या टप्प्याचे भाडे हे सात रुपये असून ते पाच रुपये करण्याबरोबरच पुढील टप्प्यांचेही भाडे कमी करण्यासाठीचे गणित आखले जात आहे. त्यासाठी परिवहन समिती सदस्य राजेंद्र महाडिक यांनी २६ जून रोजी तसे पत्र दिले आहे. सध्या टीएमटीतून रोज दोन ते अडीच लाख प्रवासी प्रवास करीत असून उत्पन्न हे २९ ते ३० लाखांच्या घरात आहे.

यामध्ये जीसीसीच्या बसमधून मिळणाऱ्या उत्पन्नाचा अधिक समावेश आहे. त्यानुसार तिकीट दर कमी केले तर परिवहनला रोज १२ ते १५ लाखांच्या उत्पन्नाला मुकावे लागणार आहे. यामुळे याचा भार पालिकेने उचलावा अशी मागणीही जोर धरू लागली आहे. परिवहन हे पालिकेचेच अंग असल्याने बेस्टप्रमाणे ठामपानेही तसा निर्णय घेतला तर पालिकेला वार्षिक सुमारे ५५ कोटींचे अनुदान परिवहनला द्यावे लागणार आहे. आधीच बजेटमध्ये पालिकेकडून परिवहनला अनुदानाची अपेक्षा असते. परंतु, दरवर्षी परिवहनच्या तोंडाला पाने पुसली जातात. असे असतांना आता वाढीव ५५ कोटींचा भुर्दंड सहन करण्याची तयारी पालिका दर्शवले का? हा सवालही या निमित्ताने उपस्थित झाला आहे.विधानसभा निवडणुकीसाठी गाजरपालिकेने यावर योग्य तो तोडगा काढावा यासाठी आता पालकमंत्री एकनाथ शिंदे हे मध्यस्थी करण्याची शक्यता आहे. त्यांनी ती केली तर पालिका याबाबतचा निर्णय घेऊन विधानसभा निवडणुकीपूर्वी ठाणेकरांचा प्रवास स्वस्त होईल, अशी अपेक्षा ठाणेकरांना करण्यास काहीच हरकत नाही.