शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
2
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
3
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
4
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
5
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
6
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
7
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
8
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
9
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
10
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
11
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
12
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
13
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
14
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
15
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
16
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
17
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
18
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
19
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
20
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी

प्रजासत्ताक दिनादिवशी टीएमटीचा संप अटळ

By admin | Updated: January 22, 2016 02:09 IST

आपल्या विविध भत्त्यांपोटी प्रशासनाकडून १२५ कोटींची थकबाकी कामगारांना मिळावी, ६१३ कामगारांना परिवहन सेवेत कायम करावे

ठाणे : आपल्या विविध भत्त्यांपोटी प्रशासनाकडून १२५ कोटींची थकबाकी कामगारांना मिळावी, ६१३ कामगारांना परिवहन सेवेत कायम करावे, सर्व कामगारांना महापालिकेत समाविष्ट करावे, या मागण्यांसाठी कामगारांची पालिका प्रशासन, महापौर आणि कामगार आयुक्तांकडेही चर्चा झाली. परंतु, त्यातून कोणत्याही प्रकारचे समाधान न झाल्याने २६ जानेवारीला त्यांनी सार्वजनिक सुट्टीची हाक दिली आहे. यानंतरही प्रशासनाने लक्ष दिले नाही तर मात्र त्याच दिवसापासून बेमुदत साखळी उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. शहराला आजघडीला ६०० बसची आवश्यकता आहे. परंतु, परिवहन प्रशासन ठाणेकरांसाठी फक्त १३० बस चालवून जनतेला सेवा देत आहे. जवळपास १३५ बस बंद आहेत, विशेष म्हणजे दोन बसचे प्रवाशी एकाच बसमधे बसवायचे व त्या बसवर काम करीत असलेल्या वाहकांच्या बॅगा चेक करायच्या अक्षरश: दोन ते तीन रूपये जरी कमी जास्त झाले तर त्यांच्यावर कारवाई होते आहे. आतापर्यंत सुमारे ७० वाहकांवर कारवाई केली आहे. ही कारवाई तत्काळ थांबवा अन्यथा आरटीओ नियमानुसार बस चालविण्यात येतील, असा इशारा परिवहन कामगारांनी दिला आहे. कामगारांनी थकबाकी आणि न्याय मिळावा यासाठी सर्व राजकीय नेते, मनपा आयुक्त संजीव जयस्वाल, महापौर संजय मोरे, विरोधी पक्षनेते संजय भोईर, आ. संजय केळकर, खा. राजन विचारे यांकडे पत्रव्यवहार केला आहे. परंतु, अद्यापही त्यांच्याकडूनही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने अखेर कामगारांनी आता २६ जानेवारीला थेट सार्वजनिक सुट्टी घेण्याचे जाहीर केले आहे.