शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

टीएमटी कर्मचा-यांचा प्रश्न : ४० कोटी रुपयांची देणी थकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 01:35 IST

ठाणे परिवहन सेवेचे अंदाजपत्रक नुकतेच सादर झाले असून यामध्ये परिवहनच्या कामगारांची महागाई भत्ता, सार्वजनिक सुट्या, वैद्यकीय भत्ता आणि सेवानिवृत्त कर्मचा-यांच्या थकबाकीपोटीची आजही ४० कोटींची देणी देणे शिल्लक असल्याचे उघड झाले आहे. जुलै २०१३ पासूनची ती असल्याचेही यातून स्पष्ट झाले आहे.

ठाणे : ठाणे परिवहन सेवेचे अंदाजपत्रक नुकतेच सादर झाले असून यामध्ये परिवहनच्या कामगारांची महागाई भत्ता, सार्वजनिक सुट्या, वैद्यकीय भत्ता आणि सेवानिवृत्त कर्मचा-यांच्या थकबाकीपोटीची आजही ४० कोटींची देणी देणे शिल्लक असल्याचे उघड झाले आहे. जुलै २०१३ पासूनची ती असल्याचेही यातून स्पष्ट झाले आहे.परिवहनच्या अर्थात टीएमटीच्या ताफ्यात आजघडीला ३१३ बस असल्या तरी प्रत्यक्षात रस्त्यावर १८० च्या आसपास धावत आहेत. परिवहनचे प्रवासी एक लाखांनी कमी झाले असून रोज सुमारे दीड लाख प्रवासी प्रवास करीत आहेत. मात्र, रोजचे उत्पन्न हे पूर्वीपेक्षा अधिक झाले आहे. यापूर्वी परिवहनला १८ ते २० लाख रुपये मिळत होते. यंदा मात्र, ते २८ ते ३० लाखांच्या घरात गेले आहे. उत्पन्न वाढत गेल्याने आता परिवहन सेवेने कर्मचाºयांची थकबाकी देण्यास सुरुवात केली आहे. पूर्वी ८० कोटींच्या घरात असलेली थकबाकीची रक्कम आजघडीला ४० कोटींपर्यंत खाली आल्याची माहिती अंदाजपत्रकातून समोर आली आहे. परंतु, उत्पन्नापेक्षा खर्च हा अधिक असल्याने परिवहनपुढे थकबाकीचा डोंगर आजही उभा आहे. यातीलच एक महत्त्वाची बाब म्हणजे आजही परिवहन कर्मचाºयांना पाचव्या आणि सहाव्या वेतन आयोगातील फरकाची रक्कम मिळालेली नाही. सहाव्या वेतन आयोगातील फरकाच्या महागाई भत्त्याची २१ कोटी ८९ लाख ९२ हजार ४५५ रुपयांची रक्कम देणे आजही प्रलंबित आहे. या रकमेतील २१ कोटी ८० लाख रुपये हे पालिकेकडे अनुदानरुपी मागण्यात आले आहेत. तसेच सार्वजनिक सुट्यापोटी, यामध्ये भाऊबीज, पाडवा, रक्षाबंधन, कामगार दिन, गणपती आदींसह इतर सुट्यांचे ५ कोटी १६ लाख, वैद्यकीय भत्यापोटी १ कोटी ६० लाख ८० हजार, रजा प्रवास भत्ता ६ कोटी ६६ लाख ५० हजार ८५०, पुरक पोत्साहन भत्ता ४१ लाख ५१ हजार ३५० आणि सेवानिवृत्त कर्मचाºयांची ४ कोटी २० लाखांची अशी एकूण मिळून सुमारे ४० कोटींची देणी शिल्लक असल्याचे समोर आले आहे.

टॅग्स :thaneठाणे