शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

टीजेएसबी सहकारी बँकेच्या वतीने 14 डिसेंबरला ठाण्यात 200 देशांतील चलनी नोटांचे अनोखे प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 22:09 IST

एक सामाजिक जबाबदारी म्हणून टीजेएसबी सहकारी बँक आपल्या ग्राहकांसाठी वेळोवेळी विविध उपक्रमांचे आयोजन करते.

ठाणे - एक सामाजिक जबाबदारी म्हणून टीजेएसबी सहकारी बँक आपल्या ग्राहकांसाठी वेळोवेळी विविध उपक्रमांचे आयोजन करते. हीच परंपरा पुढे चालवत शनिवार 14 डिसेंबर रोजी टीजेएसबी सहकारी बँक, तळ मजला, पीपल्स् एज्युकेशन सोसायटी, राम मारुती रोड, नौपाडा, ठाणे येथे सकाळी 10 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत 200 देशातील चलनी नोटा व नाण्यांचे प्रदर्शन आयोजित केले आहे.  या प्रदर्शनात ऐतिहासिक नोटांचा समावेश असून भारतासह विविध देशातील विविधरंगी, विविध आकारांच्या, विविध मूल्यांच्या, विविध आंतरराष्ट्रीय नेत्यांची छायाचित्रे असलेल्या दुर्मीळ नोटा व नाणी ठाणेकरांना पाहता येणार आहेत. इंडोनेशियातील एका नोटेवर श्री गणेशाचे चित्र, मोरोक्को या देशाची जगातील आकाराने सर्वात लहान नोट, मॉण्टेसरी कोर्स ज्यांच्यामुळे प्रसिद्ध झाला, त्या मारिया मॉण्टेसरी यांचे छायाचित्र असलेली इटलीची नोट, एव्हरेस्ट शिखर काबीज केलेल्या सर एडमंड हिलरी यांचे छायाचित्र असलेली न्यूझीलंड देशाची नोट, भारतातील पोर्तुगीज, फ्रेंच व ब्रिटिश राजवटीतील दुर्मीळ नोट, झिम्बॉब्बे देशाने प्रस्तुत केलेली तसेच गिनीज बुक्स ऑफ बर्ल्ड रेकॉर्ड मध्ये स्थान मिळवणारी शंभर ट्रिलियन डॉलर चलनी नोट, अमिताभ घोष केवळ 14 दिवस रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते, त्यांच्या सहीची एक दुर्मीळ नोट, वेस्ट इंडियन भूखंडातील गियाना देशातील पोस्टल स्टॅम्पवर श्रीकृष्ण रंगपंचमी खेळत असल्याचे चित्र अशा अनेक प्रकारच्या वैविध्यपूर्ण नोटांचे प्रदर्शन ठाणेकरांना पाहता येणार आहे. बँक ऑफ महाराष्ट्रचे निवृत्त उपव्यवस्थापक संजय जोशी यांचे हे संकलन आहे.