शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

कर थकविल्याने शाळेचा पाणीपुरवठा खंडीत; पालिकेची पहिल्यांदा कठोर कारवाई

By admin | Updated: November 17, 2016 17:56 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेने रद्द नोटा कर वसुलीच्या माध्यमातुन स्विकारण्यास सुरुवात केल्यानंतरही अनेक थकबाकीदारांनी अद्याप कर जमा न केलेला नाही.

राजू काळेभाईंदर, दि. 17 - मीरा-भार्इंदर महापालिकेने रद्द नोटा कर वसुलीच्या माध्यमातुन स्विकारण्यास सुरुवात केल्यानंतरही अनेक थकबाकीदारांनी अद्याप कर जमा न केलेला नाही. अशा थकबाकीदारांचा पाणीपुरवठाच खंडीत करण्याची कार्यवाही पालिकेने सुरु केली असुन बुधवारी सुमारे १९ लाखांचा कर थकविल्याने पहिल्यांदाच एका शाळेचा पाणीपुरवठा खंडीत केल्याने पालिकेच्या कठोर कारवाईचा प्रत्यय येऊ लागला आहे.

या शाळेचे नाव नित्यानंद प्रबोधिनी विद्यालय असे असुन ती एका लैंगिक अत्याचार प्रकरणी अटक झालेले सेनेचे उपजिल्हाप्रमुख वासुभाई नांबियार यांच्या नियंत्रणाखाली चालविण्यात येत आहे. त्यात हिंदी माध्यामाचे सुमारे ३०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेतील मराठी माध्यमाचे शिक्षण पुरेशा पटसंख्येअभावी बंद झाल्याने तुर्तास हिंदी माध्यमाचे १ ली ते १० वी पर्यंतचे शिक्षण सध्या सुरु आहे. या शाळेच्या प्राथमिक शिक्षणासाठी राज्य सरकारकडुन अनुदान प्राप्त होत असुन प्राथमिक व माध्यमिक वर्गांसाठी एकुण १० शिक्षक कर्तव्य बजावत आहेत.

या शाळेचा अंदाजे पाच वर्षांचा १९ लाखांचा मालमत्ता कर थकीत असल्याने पालिकेने अनेकदा शाळेला नोटीसा पाठविल्या. परंतु, त्याला प्रतिसाद न मिळाल्याने हि शाळा कर थकबाकीदारांच्या यादीत समाविष्ट झाली आहे. कर वसुलीसाठी पालिकेने राजकीय दबावाखाली केवळ कागदी घोडे नाचवुन कारवाई बासनात गुंडाळली. अखेर हजार, पाचशेच्या नोटा रद्द झाल्याने त्या कराच्या माध्यमातुन स्विकारण्यास पालिकेने सुरुवात केल्यानंतर थकीत कराच्या वसुलीला जोमाने सुरुवात झाली. करवसुली प्रभावीपणे करण्यासाठी पालिका आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी थेट पाणीपुरवठा खंडीत करण्याचा निर्णय घेतला.

त्याचा पहिला बळी १४ नोव्हेंबरला भार्इंदर पश्चिमेकडील रॉयल रेसिडन्सी हि इमारत ठरली. सध्या या इमारतीतील रहिवाशी खाजगी टँकरद्वारे पाणी विकत घेत आहेत. यानंतर मोठ्या थकबाकीदारांना कर भरण्यास प्रवृत्त करण्यासाठी आयुक्तांनी त्यांची यादीच प्रभाग अधिकाऱ्याकडे सोपविली. हे अधिकारी सध्या त्या थकबाकीदारांचा शोध घेऊन कर जमा करण्यासाठी त्यांना प्रवृत्त करीत आहेत. यात कर भरण्यास असमर्थता दर्शविणाय््राा मिरागावठाण मधील नित्यानंद शाळेचा पाणीपुरवठा १६ नोव्हेंबरला खंडीत केला. काही दिवसांपुर्वी शाळेने सुमारे ७ लाखांचा कर पालिकेत जमा केल्याचे शाळा व्यवस्थापनेकडुन सांगण्यात येत आहे. परंतु, उर्वरीत कर अद्याप थकीत राहिल्याने कारवाई करण्यात आल्याचे पालिकेकडुन सांगण्यात आले. यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी सोबत जास्तीत जास्त पाणी घेऊन यावे लागत असुन इतर वापरासाठी आसपासच्या वस्तीतुन पाण्याची सोय केली जात आहे.

किमान शाळेचा पाणीपुरवठा खंडीत होणे अपेक्षित नसल्याची चर्चा नागरीकांत सुरु असली तरी थकीत कर प्रकरणी कोणाचीही हयगय केली जाणार नसल्याचे प्रशासनाकडुन स्पष्ट करण्यात आले. चौकट : काशिमिरा येथील वादग्रस्त ठरलेल्या काजल लॉजिंग-बोर्डींग, शेलार प्रॉपर्टिज एक्सप्रेस ईन व सुमारे ५० लाखांची थकबाकी असलेल्या लक्ष्मी कार या मोटार विक्रीच्या शोरुमचा पाणीपुरवठा देखील खंडीत करण्यात आला असुन हि कारवाई अद्यापही सुरुच असल्याचे पालिका सुत्राकडुन सांगण्यात आले