शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

वयाच्या जाचक अटीमुळे दाेन हजार होमगाड‌्‌र्सवर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:41 IST

ठाणे : गृहरक्षक दलातील (होमगार्ड) ५०हून अधिक वयोगटातील कर्मचाऱ्यांना कोरोनाचा धोका होऊ शकतो, असे गृहीत धरून राज्य सरकारने गेल्या ...

ठाणे : गृहरक्षक दलातील (होमगार्ड) ५०हून अधिक वयोगटातील कर्मचाऱ्यांना कोरोनाचा धोका होऊ शकतो, असे गृहीत धरून राज्य सरकारने गेल्या १३ महिन्यांपासून बंदोबस्तासारखे काम देणे बंद केले आहे. त्यामुळे या दोन हजार कर्मचाऱ्यांवर आता उपासमारीची वेळ आली आहे. वयाची ही अट शिथिल करून ठाणे जिल्ह्यातील शेकडो जवानांना पुन्हा कामावर रुजू करावे, असे साकडे या कर्मचाऱ्यांनी होमगार्डचे राज्याचे महासमादेशक परमबीर सिंह यांना घातले आहे.

ठाणे जिल्ह्यातील होमगार्डच्या जवानांनी महासमादेशकांना दिलेल्या आपल्या पत्रामध्ये म्हटले आहे की, होमगार्डचे जवान हे पगारी नोकर नाहीत. मानसेवी संघटनेत ते कार्यरत आहेत. परंतु, अनेकांची २० वर्षांहून अधिक सेवा झाली आहे. एकीकडे कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या कार्यकाळापासून संचारबंदीमध्ये पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून जिल्ह्यातील नऊ हजार ५००पेक्षा अधिक होमगार्डच्या जवानांनी सेवा दिली आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये नऊ हजार ५०० पैकी तब्बल दोन हजार जवानांना एकदाही काम देण्यात आले नाही. त्यांनी जिल्हा कार्यालयात विचारणा केली तर तिथे उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. तीन तीन महिने उशिराने भेटणाऱ्या मानधनावरच या जवानांचे संसार चालतात. पण आता तेही बंद झाले. एकीकडे कोरोनाकाळात अनेकांची कामे बंद झाली. सध्या दुकानेही बंद आहेत. त्यामुळे इतरत्र कुठेही काम किंवा खासगी नोकरीही करता येत नाही. कामच मिळत नसेल तर या जवानांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी जगायचे कसे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. जे शरीराने तंदुरुस्त असतील त्यांना तरी बंदोबस्ताची कामे दिली जावीत. ५०पेक्षा जास्त वयोगटातील असूनही पोलिसांना बंदोबस्त किंवा सर्व प्रकारची कामे दिली जात असतील तर हाच न्याय होमगार्डच्या जवानांनाही दिला जावा, अशी मागणीही या पत्रात केली आहे.

......................

ठाणे जिल्हा - एकूण होमगार्डची संख्या ९५००

५० पेक्षा अधिक वयोगटातील होमगार्ड- २०००

गेल्यावर्षी मार्चपासून रेल्वे, वाहतूक आणि शहरातील सर्व बंदोबस्तावरील ५०पेक्षा अधिक वयोगटातील होमगार्ड कर्मचाऱ्यांना काम देण्यात आलेले नाही. निवृत्तीपर्यंत सर्वांनाच कोरोनाच्या या कठीण काळात कामे दिली जावीत.

- होमगार्ड जवान, ठाणे.