शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

आजपर्यंत हजारो न्याय निर्णय भारताच्या अनेक भाषांमध्ये - न्या. अभय ओक

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: May 18, 2025 17:40 IST

Thane News: मागील तीन वर्षांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने पुढाकार घेऊन इंग्रजीमध्ये दिलेल्या निर्णयाचा भारतातील प्रमुख भाषेमध्ये भाषांतर करण्याचा निर्णय घेतलेला असून आजपर्यंत हजारो न्याय निर्णय भारताच्या अनेक भाषेमध्ये भाषांतरित केलेला आहे.

- प्रज्ञा म्हात्रेठाणे - मागील तीन वर्षांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने पुढाकार घेऊन इंग्रजीमध्ये दिलेल्या निर्णयाचा भारतातील प्रमुख भाषेमध्ये भाषांतर करण्याचा निर्णय घेतलेला असून आजपर्यंत हजारो न्याय निर्णय भारताच्या अनेक भाषेमध्ये भाषांतरित केलेला आहे. तसेच मागील ३० वर्षापासून महाराष्ट्रामध्ये जिल्हा न्यायालयापर्यंत मराठीमध्येच काम केले जाते. आज उपलब्ध असलेल्या साधनांमुळे कायद्याचा अभ्यास करणे, शोध करणे, त्याचा अर्थ समजून घेणे व कमी वेळेत अनेक न्यायनिवाडे यांचे आकलन करणे फार सोपे झाले असे वक्तव्य सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी केले. 

विद्या प्रसारक मंडळ टीएमसी विधी महाविद्यालयाचा ५० व्या बॅचचा पदवी प्रदान सोहळा न्या. ओक यांच्या हस्ते पार पडला. ठाणे जिल्हा न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश श्रीनिवास अग्रवाल म्हणाले की, विधी व्यवसाय हा फार कष्टाने व नियमित अभ्यासानेच करता येतो. महाराष्ट्र व गोवा राज्य अधिवक्ता मंडळाचे माजी अध्यक्ष गजानन चव्हाण व सुदीप पासबोला यांनी विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर अधिवक्ता मंडळ त्यांना मदत करेल अशी ग्वाही दिली. संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय बेडेकर म्हणाले की, विधीशी संबंधित सर्व पुस्तके, माहिती व न्याय निर्णय हे सामान्य नागरिकांसाठी मराठी भाषेमध्ये असणे फार आवश्यक आहे व यासाठी विद्यार्थ्यांनी पुढे यावे व मराठी भाषेमध्ये कायद्याचे रूपांतर करून सामान्य नागरिकास ते उपलब्ध करून द्यावेत.

यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ईश्वर सूर्यवंशी, विद्या प्रसारक मंडळाचे सचिव अभय मराठे यावेळी मंचावर उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. श्रीविद्या जयकुमार यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाच्या शेवटी विधी महाविद्यालयाच्या १५० विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृष्णा कामत यांनी केले तसेच ओळख प्रा. विनोद वाघ, यतीन पंडित व हेतल मीशेरी यांनी करून दिली व आभार प्रदर्शन डॉ. रूपाली जामोदे यांनी केले.

टॅग्स :thaneठाणेCourtन्यायालय