शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील पावसाचा जोर आठवडाभरात वाढणार

By admin | Updated: June 21, 2016 01:24 IST

ठाणे जिल्ह्यातील पावसाचा जोर आठवडाभरात वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पुढील काही दिवस पावसाच्या अधूनमधून सरी कोसळतील आणि आठवडाभरानंतरच संततधारेचा अनुभव येईल

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील पावसाचा जोर आठवडाभरात वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पुढील काही दिवस पावसाच्या अधूनमधून सरी कोसळतील आणि आठवडाभरानंतरच संततधारेचा अनुभव येईल, असेही या अंदाजात म्हटले आहे. दरम्यान, सोमवारीही जिल्ह्याच्या काही भागांत पावसाने अधूनमधून हजेरी लावली.नद्या-धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पुरेसा पाऊस नसल्याने अजून काही दिवस पाणीटंचाई कायम राहण्याची चिन्हे आहेत. धरणे आणि नद्यांच्या परिसरात आठवडाभर जोरदार पाऊस झाला तरच त्यानंतर पाण्याची पातळी वाढेल आणि पुरेसा साठा वाढला तर १५ जुलैपर्यंत वाढलेल्या साठ्याचा अंदाज घेऊन सध्याची ४५ टक्के पाणीटंचाई मागे घेण्याचा निर्णय घेतलाजाईल, असे विविध पाणीवाटप संस्थांच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. हवामान खात्याचा अंदाजानुसार, पुढील आठवडाभर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. अधूनमधून पावसाच्या तुरळक सरी कोसळतील. पुढील आठवड्यात मात्र अंधारून येऊन जोरदार पाऊस कोसळेल. संततधारेचा अनुभव जिल्हावासीयांना येईल. रात्री काही काळ आणि सकाळी कोसळलेल्या सरींचा फटका रेल्वे आणि रस्ते वाहतुकीला काही काळ बसला. लोकल वाहतूक दहा ते १५ मिनिटे विस्कळीत होती. रस्त्यावरील वाहतूकही मंदगतीने सुरू होती. (प्रतिनिधी)अंबरनाथ आणि बदलापूर शहरात पावसाने सकाळी ११ वाजल्यापासून जोरदार हजेरी लावली. तीन तास झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील सर्व रस्त्यांवर पाणी साचले होते. सर्व नाले भरून वाहत होते. ऐन शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेत पावसाने हजेरी लावली. त्यामुळे विद्यार्थ्यांनीही भिजत शाळेत जाणे पसंत केले. तर काहींनी भिजत घर गाठले. दुपारी २ नंतर पावसाने विश्रांती घेतल्यावर पुन्हा सायंकाळी ५ वाजता हलका पाऊस पडला. पावसाच्या हजेरीमुळे शेतीची कामे लवकरच सुरू होणार आहेत.