शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षांतच क्रीडासंकुलाला पडल्या भेगा

By admin | Updated: February 9, 2017 03:53 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेने फेब्रुवारी २०१४ मध्ये लोकार्पण केलेल्या स्पोर्टस् कॉम्प्लेक्सच्या बांधकामाला अवघ्या तीन वर्षातच भेगा पडू लागल्या आहेत

भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेने फेब्रुवारी २०१४ मध्ये लोकार्पण केलेल्या स्पोर्टस् कॉम्प्लेक्सच्या बांधकामाला अवघ्या तीन वर्षातच भेगा पडू लागल्या आहेत. या भेगा पालिका बुजवत असली तरीही बांधकाम दर्जावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. संकुलासाठी भार्इंदर पूर्वेकडील नागरी सुविधा भूखंड निश्चित करण्यात आले. एकूण ११ हजार ७८७ चौरस मीटर जागेच्या १५ टक्के म्हणजेच १ हजार ७६८ चौरस मीटर जागेत स्पोर्टस् कॉम्प्लेक्स बांधण्याचे ठरविले. परंतु, ते बांधण्यासाठी कोट्यवधींची आवश्यकता असल्याने माजी खासदार संजीव नाईक यांनी निधीतून ते बांधण्याचे निश्चित करण्यात आले. सुरुवातीला तीन टप्प्यातील या स्पोर्टस् कॉम्प्लेक्ससाठी सुमारे २१ कोटी ३५ लाखांच्या निधींची तरतूद करण्यात आली. या प्रस्तावाला २० एप्रिल २०११ च्या महासभेने मंजुरी दिली. शायना कंस्ट्रक्शन या कंपनीला कंत्राट देण्यात आले. दरम्यानच्या काळात उद्भवलेल्या अडचणींवर मात करत अखेर २०१४ मध्ये ते तातडीने पूर्ण करण्यात आले. यात पालिकेतीलच काही अधिकाऱ्यांनी खो घालून बांधकामाला विलंब लावत बांधकामाच्या दर्जाकडेही दुर्लक्ष करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. प्रशासनाने अनेकदा निविदा काढल्या. परंतु, धोरणातील जाचक अटींमुळे त्याला प्रतिसाद मिळाला नाही. कॉम्प्लेक्ससाठी खर्च करण्यात आलेला निधी सत्कारणी लागत नव्हता. महासभेने धोरण ठरविण्याचा अधिकार तत्कालिन आयुक्त डॉ. नरेश गीते यांना दिला. आयुक्तांनी ठिकठिकाणच्या क्रीडा संस्थांचे दर तसेच त्यांच्या अटी-शर्तींचा लेखाजोखा मागवून धोरण तयार करण्याची प्रक्रीया सुरु केली. तीन वर्षांपासून तांत्रिक अडचणींसह धोरण निश्चित न झाल्याने त्याला भेगा पडू लागल्या आहेत. दरम्यान, शहर अभियंता शिवाजी बारकुंड व सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक खांबित यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याशी होऊ शकलेला नाही. (प्रतिनिधी)