शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
3
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
4
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
5
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
6
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
7
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
8
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
9
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
10
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
11
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
12
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
13
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
14
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
15
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
16
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
17
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
18
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
19
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
20
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."

तीन वर्षे सांडपाणी खाडीतच

By admin | Updated: June 29, 2017 02:53 IST

डोंबिवली औद्योगिक परिसरातील फेज टूमधील रासायनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र चालविण्यास एमआयडीसीने नकार दिला आहे.

मुरलीधर भवार । लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : डोंबिवली औद्योगिक परिसरातील फेज टूमधील रासायनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र चालविण्यास एमआयडीसीने नकार दिला आहे. त्याचवेळी कापड प्रक्रिया कारखाने आणि रासायनिक कारखान्यातील सांडपाण्यावर स्वतंत्र प्रक्रिया करता यावी, यासाठी त्यांच्या वाहिन्यांच्या वर्गीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यानंतर स्वतंत्र वाहिनी टाकून हे पाणी खाडीत सोडले जाईल. त्याला तीन वर्षे लागणार असल्याने तोवर रसायनमिश्रित सांडपाणी तसेच खाडीत सोडले जाईल. रासायनिक कारखान्यांच्या सांडापाणी प्रक्रियेचा विषय हरीत लवादापुढे आहे. त्यातून ८६ कारखाने बंद झाले होते. आता २५ टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची मुभा मिळाली आहे. तो प्रस्ताव प्रदूषण मंडळाच्या मुंबई कार्यालयाकडे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. एमआयडीसीच्या दोन्ही फेजमध्ये कापड प्रक्रिया आणि रासायनिक कारखान्यांतील सांडपाण्यावर एकत्र प्रक्रिया केली जाते. ती वेगळी करण्याचे काम एमआयडीसीने हाती घेतले आहे. फेज वनमधील प्रक्रिया केंद्रात केवळ कापड उद्योगातून निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया होईल आणि फेज टूमध्ये रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाईल. त्यांच्या वर्गीकरणाचे काम यंदा डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. प्रक्रिया वेगळी झाल्यास प्रदूषण कमी होण्यास मदत होईल, असा एमआयडीसीचा दावा आहे. त्याची निविदा जरी पंधरवड्यात निघणार आहे. त्यानंतर ठाकुर्लीतून खाडीपर्यंत सांडपाणी वाहून नेण्यासाठी वाहिनी टाकली जाईल. तिला तीन वर्षे लागतील. सांडपाणी वाहून नेण्यासाठी दीड किलोमीटरची वाहिनी टाकण्यात आली आहे. ठाकुर्ली रेल्वेब्रीज ते कल्याण खाडीपर्यंत साडेसात किलोमीटरची रासायनिक सांडपाणी वाहून नेणारी पाइपलाइन टाकण्याच्या कामासाठी १०४ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. तो एमआयडीसी करणार आहे. त्याची निविदा पंधरवड्यात काढली जाईल, असे एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ही पाइपलाइन टाकण्याचे काम तीन वर्षात पूर्ण केले जाईल, असे एमआयडीसीने कळवल्याचे प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.