शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

विनयभंग करणाऱ्याला तीन वर्षांची शिक्षा; ठाण्याच्या पाेक्साे न्यायालयाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2023 07:54 IST

पीडित अल्पवयीन मुलगी शाळेत जात असताना आरोपीने तिला वाटेत थांबवून लग्नासाठी तगादा लावला.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिचा विनयभंग  करणाऱ्या प्रीतेश ऊर्फ  बाबू दिनेश कांबळे (३५) या आरोपीला ठाण्याच्या विशेष पोक्सो न्यायालयाने तीन वर्षांचा कारावास आणि दोन हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.  अन्य कलमांतर्गत आरोपीला न्यायालयाने दोन वर्षांचा कारावास आणि दंड ठोठावल्याची माहिती सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी बुधवारी दिली.

पीडित अल्पवयीन मुलगी शाळेत जात असताना आरोपीने तिला वाटेत थांबवून लग्नासाठी तगादा लावला. लग्न न केल्यास ठार मारण्याचीही त्याने धमकी दिली. हा प्रकार मुलीने घरी सांगितल्यानंतरही प्रीतेशने मुलीला  सातत्याने त्रास दिला. त्यामुळेच आठवीतील या मुलीला शाळाही सोडावी लागली. मे २०१८ मध्ये तिला तिला आरोपीने पुन्हा त्रास देण्यास सुरुवात केली. तिच्या पालकांनाही त्याने शिवीगाळ करून बघून घेण्याची धमकी दिली. याप्रकरणी  मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर वर्तकनगर पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सुनावणी विशेष पोक्सो न्यायालयात  झाली. 

पुरावे ग्राह्य धरत निर्णयसर्व साक्षी, पुरावे ग्राह्य धरत अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. विरकर यांनी पोक्सो कायद्यांतर्गत आरोपीला तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा तसेच दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.  दंड न भरल्यास २० दिवसांची साधी कैद आरोपीला भोगावी लागणार आहे. कलम ५०४, ५०६ अंतर्गत आरोपीला दोन वर्षांचा कारावास आणि एक हजार रुपये दंड ठोठावला आहे.