शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

भरकटलेल्या तीन ट्रेकर्सची मध्यरात्री जंगलातून सुटका

By admin | Updated: August 9, 2016 02:14 IST

ट्रेकिंगची आवड असलेले मुंबईतील तीन मित्र रविवारी सकाळी सफाळा येथील पूर्वेकडील तांदुळवाडी किल्ल्यावर गेले होते.

डहाणू/सफाळे : ट्रेकिंगची आवड असलेले मुंबईतील तीन मित्र रविवारी सकाळी सफाळा येथील पूर्वेकडील तांदुळवाडी किल्ल्यावर गेले होते. मात्र सायंकाळच्या परतीच्या वेळी रस्ता चुकल्याने ते येथील घनदाट जंगलात भरकटले जाऊन संकटात सापडले होते. याची माहिती मिळताच सफाळे पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने रात्रीच्या अंधारात तब्बल पाच तास संबंध जंगलात सर्च आॅपरेशन करुन तिघांची सुखरूप सुटका केली. अभिजित मांजरेकर (२९) रा. नवीमुंबई, चंदन ठाकूर (२५) रा. गोरेगाव आणि ओमकार पळसे (२५) रा. विरार हे तिघेही मित्र. अभिजित व चंदन टीसीएस या कंपनीत कामाला असून ओमकारही एका खाजगी कंपनीत काम करतो. या तिघांनाही ट्रेकिंगची अत्यंत आवड. त्यामुळेच त्यांनी आत्तापर्यंत जेजुरी, कळसूबाई शिखर अशा विविध गड किल्ल्यांवर आपली ट्रेकिंगची आवड जोपासली. त्याच अनुषंगाने या तिघा मित्रांनी सफाळे पूर्वेकडील घनदाट जंगलातील तांदुळवाडी किल्ला निवडला. ठरल्याप्रमाणे शनिवारी सकाळीच साधारण ७ वाजण्याच्या सुमारास तांदुळवाडी फाट्याजवळील पायवाटेने त्यांनी चढाईस सुरुवात केली. दिवसभर संपूर्ण किल्ल्यासह येथील निसर्गरम्य परिसराचा व पावसात भिजण्याचाही त्यांनी पुरेपूर आनंद लुटला. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास त्यांनी परतीचा मार्ग धरला खरा, परंतु ढगाळ वातावरणामुळे लवकरच सर्वत्र अंधार पडला. तिघेही भराभर आल्यापावली परतु लागले खरे. मात्र सतत तीन ते चार तास चालूनही ते किल्याच्या पायथ्याशी पोहोचू शकले नाही. त्यानंतर झपाझप परतीचा प्रवास सुरु केला मात्र पावसाने दगा दिला आणि थोड्याच वेळात त्यांना रानभूल पडली. पोलीस व ग्रामस्थांच्या तब्बल पाच तासांच्या प्रयत्नानंतर ते एका दरीत पोहोचल्याचे आढळून आले. या सर्च आॅपरेशनच्या यशा बद्दल कौतुक केले जात आहे. (वार्ताहर)