शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीतील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी गोदामांच्या आठवड्यातून तीन सुट्यां विचाराधीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 16:46 IST

गोदामांमुळे भिवंडी परिसरातील वाहतूक कोंडी मोठ्याप्रमाणात होते. ती कमी करण्याचा दृष्टीने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत सूचना केल्या होत्या. यास अनुसरून ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी तहसीलदार, वाहतूक संघटना व गोदाम मालकांची बैठक तातडीने घेण्याचे निर्देश डॉ. नळदकर यांना दिले. त्यानुसार पहिली बैठक घेण्यात आली.

ठळक मुद्देवेगवेगळ्या दिवशी तीन सुट्या लागू झाल्यानंतर या गोदामांची रविवारची साप्ताहीक सुट्टी मात्र रद्दत्यासाठी लवकरच दुसरी बैठक या सुट्यांमुळे काय परिणाम होईल, अन्य काही समस्या उद्भतील का आदींवर या बैठकीत चर्चा होईल

ठाणे : येथील मुंब्रा बायपास सोमवारपासून सुरू होईल. तरी देखील मागील अनुभव लक्षात घेता भिवंडी परिसरात वाहतूक कोंड होईल. यावर वेळीच उपाययोजना म्हणून भिवंडीच्या गोदामांना वेगवेगळ्या दिवशी आठवड्यातून तीन सुट्या देण्याचा निर्णय विचाराधीन आहे. यासाठी शनिवारी बैठक घेऊन त्यात प्राथमिक पातळीवरील हा निर्णय भिवंडी उपविभागीय अधिकारी डॉ. मोहन नळदकर यांनी वाहतूक संघटना व गोदाम मालकांना विश्चासत घेऊन घेतला.गोदामांमुळे भिवंडी परिसरातील वाहतूक कोंडी मोठ्याप्रमाणात होते. ती कमी करण्याचा दृष्टीने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत सूचना केल्या होत्या. यास अनुसरून ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी तहसीलदार, वाहतूक संघटना व गोदाम मालकांची बैठक तातडीने घेण्याचे निर्देश डॉ. नळदकर यांना दिले. त्यानुसार पहिली बैठक घेण्यात आली. त्यात वेगवेगळ्या दिवशी तीन सुट्या घेणे शक्य आहे का, याविषयी चर्चा झाली. तरी देखील यावर शिक्का मोर्तब करण्यासाठी लवकरच दुसरी बैठक घेण्यात येईल, असे डॉ. नळदकर यांनी लोकमतला सांगितले.वेगवेगळ्या दिवशी तीन सुट्या लागू झाल्यानंतर या गोदामांची रविवारची साप्ताहीक सुट्टी मात्र रद्द होईल. यानंतर पूर्णा, राहनाळ परिसरातील गोदामांना मंगळवारी सुटी मिळेल. तर काल्हेर, कशेळी भागातील गोदामांना बुधवारी सुटी राहील. तसेच दापोडे, वळ भागातील गोदामे शुक्रवारी बंद राहतील. या सुट्या विभागल्याने भिवंडी परिसरातील गोदामांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा ताण पडणार नाही. यावर पहिल्या बैठकीत चर्चा झाली. पण त्यासाठी लवकरच दुसरी बैठक आयोजित करण्यात येईल. यामध्ये वाहतूक पोलिस, पोलिस, गावपातळीवरील ग्राम सेवक, तलाठी, पोलिस पाटील आदी सरकारी प्रतिनिधींसह गोदाम मालक आणि वाहतूक संघटना आदींचा समावेश राहील. त्यांच्या समक्ष या लागू होणाऱ्या तीन दिवशीय सुट्यांवर पुन्हा चर्चा होईल. या सुट्यांमुळे काय परिणाम होईल, अन्य काही समस्या उद्भतील का आदींवर या बैठकीत चर्चा होईल. त्यानंतर या तीन दिवशीय सुट्यांचा निर्णय घेणार असल्याचे डॉ. नळदकर यांनी स्पष्ट केले. शनिवार पार पडलेल्या या बैठकीला तहसिलदार शशिकांत गायकवाड, सहायक पोलिस आयुक्त अविनाश मोहिते, पोलीस निरीक्षक राजन रास्ते, एम एन सातिदवे, आर. पी. भामे आणि गोदाम मालक आदींची उपस्थित असल्याचे डॉ. नळदकर यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेbhiwandiभिवंडी