शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील १५ ठिकाणे पालिकेने केली कंटनमेंट झोन म्हणून जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 15:22 IST

ठाणे महापालिकेने आता कोरोनावर मात करण्यासाठी ज्या ज्या भागात कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत, ते शहरातील १५ भाग कंटनमेंट झोन म्हणून घोषीत केले आहे. या भागातील नागरीकांना अत्यावश्यक सेवा पुरविल्या जात आहेत.

ठाणे : ठाणे शहरात विविध ठिकाणी सध्या कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाझतांना दिसत आहे. कळवा, मुंब्रा मध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. शहरातील दोन प्रभाग समिती वगळल्या तर जवळ जवळ प्रत्येक प्रभाग समितीत कोरोना रुग्ण आढळला आहे. आता पर्यंत शहरात जवळ जवळ २६ कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आता ज्या ज्या भागात हे रुग्ण आढळले आहेत, असे १५ विभाग पालिकेने कंटेनमेंट झोन (बाधीत क्षेत्र ) म्हणून जाहीर केले आहेत. कोरोना रुग्णांची संख्या वाढू नये म्हणून पालिकेने हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.                      ठाणे शहरामध्ये काजूवाडी, दोस्ती विहार, हॅप्पी व्हॅली मानपाडा, साईबाबानगर कळवा, लोढा पॅराडाइज माजीवडा, रुणवाल गार्डन, धोबीआळी, कौसा अमृतनगर येथील विघ्नहर्ता इमारत, कळवा मनिषानगर, एमजी रोड नौपाडा, वृंदावन सोसायटी आणि विटावा सूर्यानगर ही १५ ठिकाणे कंटनमेंट झोन म्हणून घोषीत करण्यात आले आहेत. या क्षेत्रामध्ये बाहेरील कोणी आतमध्ये जाऊ शकणार नसून आतील माणूस हा बाहेर जाऊ शकणार नाही. परंतु आतमध्ये असलेल्या नागरीकांनासाठी अत्यावश्यक सुविधा पुरविण्याची हमी देखील देण्यात आली आहे. त्यामुळे एकामुळे येथील इतर नागरीकांचे हाल होत असले तरी केवळ सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातून पालिकेने हे पाऊल उचलले आहे. या भागात कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत, त्यातही कळव्यात सर्वाधिक म्हणजे १० रुग्ण आढळून आले आहेत. तर मुंब्य्रातील अमृत नगर भागात आतापर्यंत ४ रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील एकाचा मृत्यु झाला आहे. तर शहरातील महापालिकेच्या वागळे आणि दिवा प्रभाग समिती वगळता इतर सात प्रभाग समितीमध्ये रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे पालिकेने हे पाऊल उचलले असल्याचे सांगितले आहे दिव्यात अद्याप एकही रुग्ण आढळला नसला तरी येथील नागरीकांनी लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद दिला आहे. तसेच येथील रहिवाशांसाठी देखील घरपोच किराणा आणि इतर सुविधा देण्यासाठी प्रभाग समितीकडून प्रयत्न सुरु आहेत.या भागातील नागरीकांसाठी इतर सोई सुविधा या पुरविल्या जात आहेत. जेणे करुन येथील नागरीक विनाकारण बाहेर न येता, त्यापासून इतरांना काही बाधा होऊ नये म्हणून देखील हा प्रयत्न पालिकेने केला आहे. नागरीकांनी यासाठी सहकार्य करावे असेही पालिकेने आवाहन केले आहे.

प्रभाग समिती                         कोरोना रुग्ण१) माजिवडा मानपाडा              ०५२) वर्तकनगर                            ०१३) लोकमान्य सावरकरनगर      ०२४) नौपाडा                               ०३५)उथळसर                             ०१६) वागळे                               ००७) कळवा                             १०८) मुंब्रा                                 ०४९) दिवा                                ००-------------------------------एकूण                                 २६ 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या