शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात इमारतीचा स्लॅब कोसळून तीन जण गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:45 IST

उल्हासनगर : कॅम्प नं.१, सी ब्लॉक परिसरातील पाच मजली देवऋषी इमारतीचा पहिल्या मजल्याचा स्लॅब कोसळून तळमजल्यावर राहणारे गिधवानी ...

उल्हासनगर : कॅम्प नं.१, सी ब्लॉक परिसरातील पाच मजली देवऋषी इमारतीचा पहिल्या मजल्याचा स्लॅब कोसळून तळमजल्यावर राहणारे गिधवानी कुटुंबातील तिघे जण गंभीर जखमी झाले. सहायक आयुक्त गणेश शिंपी यांच्या नेतृत्वाखाली इमारत रिकामी करण्यात येत असून तब्बल २७ फ्लॅटधारकांची राहण्याची पर्यायी व्यवस्था करण्यात येत आहे.

उल्हासनगरात इमारतीचे स्लॅब कोसळण्याचे सत्र सुरू असून कॅम्प नं.१, सी ब्लॉक साईबाबा मंदिर जवळील देवऋषी इमारतीचा पहिल्या मजल्याचा स्लॅब कोसळून हॉलमध्ये बसलेले राजू गिधवानी (५७), कांता गिधवानी व ८ वर्षांची जन्नत विक्की गिधवानी असे तीन जण जखमी झाले. इमारतीचा स्लॅब कोसळल्याची माहिती सहायक आयुक्त शिंपी यांना मिळाल्यावर, त्यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले. सुरक्षेचा उपाय म्हणून इमारत रिकामी करण्यात येत आहे. तळमजल्यावर दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे काहीचे म्हणणे होते.

देवऋषी ही इमारत १९९४ साली बांधण्यात आली असून इमारतीला स्ट्रक्चरल ऑडिटची नोटीस यापूर्वी महापालिकेने पाठविली होती, अशी माहिती उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिली. १९९४ ते ९८ दरम्यान बांधण्यात आलेल्या इमारतीचे सर्वेक्षण पालिकेने करून ५०५ इमारतींना एका महिन्यात स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या नोटिसा दिल्या होत्या. नागरिकांनी तातडीने इमारतीचे ऑडिट करावे, असे आवाहन नाईकवाडे यांनी केले. एका महिन्यापूर्वी मोहिनी पॅलेस व साईशक्ती इमारतीचा स्लॅब कोसळून १२ जणांचा बळी गेला.

...............

वाचली