शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

‘दोस्ती रेंटल’च्या संक्रमण शिबिरातील तिघांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 03:46 IST

ठाणे : रस्ता रुंदीकरण, धोकादायक इमारती तसेच पालिकेच्या विविध योजनांमध्ये बाधित झालेल्या कुटुंबीयांना निवासासाठी असलेल्या दोस्ती रेंटलच्या घरांमध्ये भलतेच पोटभाडेकरू आढळल्याने वर्तकनगर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाणे : रस्ता रुंदीकरण, धोकादायक इमारती तसेच पालिकेच्या विविध योजनांमध्ये बाधित झालेल्या कुटुंबीयांना निवासासाठी असलेल्या दोस्ती रेंटलच्या घरांमध्ये भलतेच पोटभाडेकरू आढळल्याने वर्तकनगर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वर्तकनगरात ठाणे पालिकेने उभारलेल्या दोस्ती संक्रमण शिबिरांत लाभार्थ्यांऐवजी पोटभाडेकरूंकडून सदनिकांचा वापर होत असल्याच्या तक्रारी पालिकेकडे आल्या होत्या. उपअभियंता प्रदीप घाडगे, दोस्ती रेंटल हाउसिंगचे व्यवस्थापक रत्नाकर सातपुते आणि दर्शना सावरकर यांच्या पथकाने अचानकपणे २१ आॅगस्टला छापा टाकून तपासणी केली होती. त्यात पोटभाडेकरू ठेवून दुप्पट भाडे आकारणी करून घरे दिल्याचे उघडकीस आले. त्याची कागदपत्रे तपासल्यानंतर आता हा गुन्हा दाखल झाला आहे.याप्रकरणी तबस्सुम जबार, मुरतुजा जबार, एम. डी. मुबीन, सुलताना मुबीन, शाहिन कुरेशी तसेच जिहंद कुरेशी यांच्या घरात जगदीश जुदिकया, नंदा ठाकूर आणि प्राची खाडे वास्तव्य करत असल्याचे आढळले. ठाण्यातील रस्ता रूंदीकरण आणि अन्य विकास प्रकल्पांमध्ये बाधित झालेल्या नागरिकांना संक्र मण शिबिरांमध्ये राहण्यास जागा दिली होती. वर्तकनगर परिसरात ही शिबिरे असून तेथे महापालिकेने घरे दिली होती. दोन हजार रु पयांच्या शुल्कावर या सदनिका देण्यात आल्या असून संक्र मण शिबिर म्हणून या भागात सदनिका दिल्या जातात. काही सदनिकांमध्ये लाभार्थ्यांनी स्वत:ऐवजी पोटभाडेकरू ठेवल्याची माहिती महापालिका प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार, मालमत्ता विभागातील उपअभियंता प्रदीप घाडगे यांनी धाड टाकल्यानंतर हा प्रकार उघड झाला. चौकशीनंतर त्याबाबत गुन्हाही दाखल झाला.>विश्वासघाताचा गुन्हापोटभाडेकरूंकडून ४ ते ५ हजार भाडे घेतले जात होते. पालिकेच्या परवानगीशिवाय घरे भलत्याच व्यक्तीला देऊन विश्वासघात केल्याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. पण अद्याप कोणालाही अटक केली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणे