शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
6
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
9
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
10
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
11
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
12
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
13
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
14
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
15
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
16
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
17
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
18
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
19
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
20
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

तीन महिन्यांसाठी एसटी पुन्हा रस्त्यावर

By admin | Updated: January 5, 2017 05:34 IST

१ जानेवारीपासून शहरी बस वाहतूक बंद पडल्याने नोकरदार, बागायतदार आणि विद्यार्थ्यांची होत असलेली गैरसोय लक्षात घेऊन सर्वपक्षीय नेत्यांनी बुधवारी सकाळपासूनच नालासोपारा डेपोत

शशी करपे, वसई१ जानेवारीपासून शहरी बस वाहतूक बंद पडल्याने नोकरदार, बागायतदार आणि विद्यार्थ्यांची होत असलेली गैरसोय लक्षात घेऊन सर्वपक्षीय नेत्यांनी बुधवारी सकाळपासूनच नालासोपारा डेपोत धरणे आंदोलन करीत एसटी वाहतूक बंद पाडली होती. या आंदोलनाच्या दणक्याने परिवहन विभागाने ३१ मार्चपर्यंत शहरी बस वाहतूक सुरु करण्याचा निर्णय घेत बसेस सुरु केल्या. त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी जल्लोष केला. महापालिका अस्तित्वात आल्यानंतर त्याठिकाणी एसटी बस वाहतूक बंद करून महापालिकेची परिवहन सेवा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार वसई विरार पालिकेने २०१२ रोजी परिवहन सेवा सुरु केल्यानंतर एसटीने ४८ मार्गावर बस सुरु करण्याचे निर्देश महापालिकेला दिले होते. मात्र, महापालिकेने ३४ मार्गावर बससेवा सुरु केली होती. त्यामुळे एसटी महामंडळाने उर्वरित १४ मार्गावर तोटा सहन करीत बस वाहतूक सुरु ठेवली होती. सप्टेंबर महिन्यात एसटीने वसई आणि नालासोपारा डेपोतून सुटणाऱ्या शहरी बसेस बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, महापालिकेने बसेसची कमतरता आणि जागेची अडचण पुढे करीत बस सेवा सुरु करण्यास असमर्थता व्यक्त केली होती. महापालिका बस सुुरु करण्यास टाळाटाळ करीत होती. तर एसटी महामंडळाच्या वरिष्ठ पातळीवर २५ मार्गावरील बस वाहतूक बंद करण्याचे आदेश आले होते. त्यामुळे पालघर विभाग नियंत्रकांनी १ जानेवारीपासून बस सेवा बंद केली होती. सध्या दहावीच्या प्रिलीम परिक्षा सुरु आहेत. त्यांच्यासोबत ग्रामीण भागातून सकाळी मुंबईच्या बाजारात भाजीपाला आणि फुले घेऊन जाणारे बागायतदार आणि नोकरदार यांचे हाल सुरु झाले होते. एसटी बंद पडल्याने रिक्षा चालकांनी अडवणूक करीत चारपट दर आकारणी सुरु केली होती. त्यामुळे सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्रित येऊन बुधवारी सकाळपासूनच नालासोपारा एसटी डेपोसमोर धरणे आंदोलन करून एसटी वाहतूक बंद पाडली होती. जनआंदोलन समितीच्या डॉमणिका डाबरे, भाजपाचे राजन नाईक, काँग्रेसचे विजय पाटील, बहुजन विकास आघाडीचे सभापती पंकज चोरघे, नगरसेवक अजित नाईक, नगरसेवक मार्शल लोपीस, नगरसेविका रंजना थालेकर, नगरसेविका सुषमा लोपीस, महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष भरत पेंढारी यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी शेकडो गावकरी उत्फ्सूर्तपणे आंदोलनात सहभागी झाले होते. त्यामुळे एसटी वाहतूक ठप्प होऊन वातावरण तणावग्रस्त झाले होते. दरम्यान, आंदोलन सुुरु असताना भाजपाचे सरचिटणीस राजन नाईक आणि उपाध्यक्ष मनोज पाटील मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्र्यांच्या कार्यालयाशी सतत संपर्क साधून तोय्ऋगा काढण्याचा प्रयत्न करीत होते. तर शिक्षक आमदार कपिल यांनी वसईतून मुंबईला मोठ्या प्रंमाणावर जाणाऱ्या शिक्षकांची गैरसोय परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या निदर्शनास आणून देऊन शिष्टाई केली होती.