मुंब्राः येथील रेल्वे स्थानकाजवळील बाजारपेठेतील मुसा कासम या इमारतीमधील पहिल्या माळ्यावरील रूम नंबर ९ मध्ये राहत असलेल्या इरफान मेमन या व्यापाऱ्याच्या घराच्या मागच्या दरवाजाची लोखंडी जाळी कापून चोराने दरवाजाची कडी उघडून घरात प्रवेश केला. घरातील शयनकक्षातील लोखंडी कपाटामध्ये ठेवलेले विविध प्रकारचे एक लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, तसेच रोख १ लाख ८० हजार रुपये आणि १५ हजारांचे तीन मोबाइल असा एकूण २ लाख ९५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. शनिवारी रात्री याबाबतची तक्रार मेमन यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
मुंब्र्यात तीन लाखांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:46 IST