शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

१९ लाखांच्या चरससह त्रिकूट जेरबंद

By जितेंद्र कालेकर | Updated: June 26, 2024 20:29 IST

ठाणे खंडणी विराेधी पथकाची कारवाई : पाेलिस काेठडीत रवानगी

लाेकमत न्यूज नेटवर्कठाणे : चरस या अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या अनिलकुमार प्रजापती (४२) याच्यासह तिघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून एक किलाे ८९० ग्रॅम वजनाचे १८ लाख ९० हजारांचे चरस हस्तगत केल्याची माहिती पाेलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी बुधवारी दिली.

अमली पदार्थ विक्रीसाठी एक व्यक्ती भिवंडीतील टेमघर पाइपलाइन रोडलगत येणार असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाला मिळाली हाेती. त्याच माहितीच्या आधारे विशेष कृती दलाचे सहायक पाेलिस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पाेलिस निरीक्षक मालाेजी शिंदे, निरीक्षक वनिता पाटील, सहायक पाेलिस निरीक्षक सुनील तारमळे, भूषण कापडणीस, श्रीकृष्ण गाेरे आणि उपनिरीक्षक विजयकुमार राठाेड आदींच्या पथकाने १३ जून राेजी सायंकाळी सहाच्या सुमारास सापळा रचून अनिलकुमार याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक किलाे ७२० ग्रॅम वजनाचे एक १७ लाख २० हजारांचे चरस जप्त केले.

याप्रकरणी शांतीनगर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिलकुमार याला अर्जुनकुमार प्रजापती (३८) या त्याच्याच चुलत भावाने चरस विक्री केल्याची माहिती तपासात समाेर आली. त्याच आधारे त्याला खंडणी विराेधी पथकाने २० जून राेजी अटक केली. या प्रकरणात अर्जुनकुमार हा मुख्य सूत्रधार असल्याचेही समाेर आले. त्यानेच श्यामबाबू सराेज (५१) यालाही चरस विक्री केली. त्यानंतर त्यालाही नवी मुंबईतून २१ जून राेजी अटक केली. त्याच्या घरातून एक लाख ७० हजारांचे १७० ग्रॅम वजनाचे चरस जप्त करण्यात आले. या तिघांकडून आतापर्यंत १८ लाख ९० हजारांचे चरस जप्त केले आहे. सहायक पाेलिस निरीक्षक तारमळे हे अधिक तपास करीत आहेत.सूत्रधार अर्जुनकुमार विरुद्ध उत्तरप्रदेशात अनेक गुन्हे-चरसची तस्करी करणारा मुख्य सूत्रधार अर्जुनकुमार प्रजापती याच्याविरुद्ध उत्तरप्रदेशात प्रयागराजमधील कैन्ट पाेलिस ठाण्यात हत्यार कायद्यासह एनडीपीएस कायद्याखाली पाच गुन्हे दाखल आहेत. 

टॅग्स :Drugsअमली पदार्थ