शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आठवड्यातील तीन दिवस रस्त्यावरच मंडई

By admin | Updated: August 27, 2015 00:28 IST

केडीएमसीच्या विविध वॉर्डांमध्ये निरनिराळ्या समस्या दिसतात. काही ठिकाणी पालिकेने त्यांचे निराकरण केलेले आहे. तर कुठे त्यांच्या निर्मूलनासाठी तरतूदच केलेली नाही.

- अनिकेत घमंडी,  डोंबिवलीकेडीएमसीच्या विविध वॉर्डांमध्ये निरनिराळ्या समस्या दिसतात. काही ठिकाणी पालिकेने त्यांचे निराकरण केलेले आहे. तर कुठे त्यांच्या निर्मूलनासाठी तरतूदच केलेली नाही.खंबाळपाडा वॉर्ड ६२ येथे भाजी मंडई उपलब्ध असूनही ती इमारत धूळखात पडलेली आहे. तर, वॉर्ड क्र. ६८ मध्ये मंडईसाठी आरक्षण नसल्याने इमारतच नाही. त्यामुळे हमरस्त्यावरच दुतर्फा आठवड्यातून बुधवार, शुक्रवार आणि गुरुवार असे तीन दिवस भाजीबाजार भरविण्यात येतो. डोंबिवलीकरांची झुंबड येथे बघायला मिळते. त्यामुळे या ठिकाणी रस्त्यावर प्रचंड गर्दी असते. यात एखादे वाहन आले तर त्यास वाट काढताना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते. यासाठी सुसज्ज भाजीमंडई उभारणे गरजेचे आहे. याच ठिकाणाहून वसई-अहमदाबाद रेल्वे लाइन गेली आहे. रेल्वेच्या फ्रेट कॉरिडोरसाठी २५० रहिवाशांची घरे बाधित होण्याची शक्यता आहे. त्यास नगरसेवकांसह रहिवाशांनी विरोध केला असून हरकतीही घेतल्या आहेत. परंतु, त्याचा निर्णय अद्यापही झालेला नाही. जागेच्या मोबदल्यात जागा अथवा चांगली रक्कम (आजच्या बाजारभावाप्रमाणे) देण्यात यावी, असे नागरिकांचे म्हणणे आहे. परंतु, रेल्वे मात्र २००८ च्या रेटनुसार मोबदला तसेच ज्याच्या नावे जागा आहे, त्यालाच तो देणार असल्याचे सांगते. त्यामुळे ज्यांचे पागडी अथवा चाळीत घर आहे, त्यांच्यासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.मेरीटाइम बोर्डाच्या माध्यमातून येथे खाडीकिनारा विकसित करण्यासह सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सुमारे ६६ लाखांच्या निधीतून जेट्टी बनवण्यात आली आहे. त्या ठिकाणी बहुतांशी ज्येष्ठ नागरिक पहाटे फेरफटका मारायला जातात. चाळींसह काही प्रमाणात इमारतींचा हा परिसर असून तेथे पककया पायवाटा बांधण्यात आल्या आहेत. काही वर्षांपूर्वी पाण्याची समस्या होती, ती आता संपली आहे.मेरीटाइम बोर्डाकडून निधी आणून काम झालेला हा एकमेव वॉर्ड आहे. रहिवाशांच्या जागांच्या समस्या सुटण्यासाठी राज्य शासनाने एफएसआय वाढवून द्यावा, जेणेकरून भाजी मंडईसह अन्य तांत्रिक मुद्यांच्या समस्या सुटतील. रेल्वे कॉरिडोरसंदर्भात रहिवाशांसोबतच रेल्वेशी पाठपुरावा सुरू आहे. आमदार-महापौरांच्या निधीतून विकासकामे करण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. चाळींमधील पायवाटांसह अन्य कामे झाली आहेत. - सरोज भोईर, नगरसेविका, देवीचापाडा