शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यात तीन लाचखोर अधिकारी अटकेत; टिटवाळ्यात एकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 05:08 IST

मुंब्य्रात कनिष्ठ अभियंत्यांचा समावेश

ठाणे : मुंब्य्रात पाणीपुरवठा विभागाचा कनिष्ठ अभियंता संजय वाघुलेला ८० हजारांची लाच स्वीकारताना, तर टिटवाळा येथे अनधिकृत बांधकामावर कारवाई न करण्यासाठी १५ हजारांची लाच स्वीकारताना हेमंत भगतला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी अटक केली.

मुंब्रा येथील मजूर ठेकेदाराचे बिल मंजूर झाले होते. त्याचा मोबदला म्हणून ठाणे पालिकेच्या मुंब्रा प्रभाग समितीमधील पाणीपुरवठा विभागाचा कनिष्ठ अभियंता वाघुलेने ठेकेदाराकडे एक लाख २५ हजारांची लाच मागितली. तडजोडीअंती ८० हजार देण्याचे ठरले. यासंदर्भात प्राप्त झालेल्या तक्रारींची ११ मार्चला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली. त्यानंतर १२ मार्चला वाघुलेला अटक केली. त्याच्याविरुद्ध मुंब्रा पोलीसांत गुन्हा दाखल केला.

तर, ठाण्यातील वर्तकनगर भागातील रहिवाशाने चाळींचे अनधिकृत बांधकाम केले. त्यावर पालिकेमार्फत कारवाई न करण्यासाठी कल्याण तालुका पोलीस ठाण्याचा पोलीस नाईक नारायण गाडेने या रहिवाशाकडे ५० हजारांची लाच मागितली. याच अनुषंगाने लावलेल्या सापळ्यामध्ये ११ मार्च रोजी हेमंत भगतला लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहाथ अटक केली. तर, गाडेचा शोध ुसुरू आहे. दोघांविरुद्ध कल्याण तालुका पोलीसांत गुन्हा दाखल आहे.

पडताळणीनंतर अटकजातवैधता प्रमाणपत्र देण्यासाठी कोकण विभागाच्या स्नेहल गोवेकर या वरिष्ठ संशोधन अधिकारी महिलेने आणि कामाठी अमित मोरे या दोघांनी ९० हजारांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध १२ मार्च रोजी गुन्हा दाखल झाला आहे.याप्रकरणी १५ जानेवारी रोजी पडताळणी झाली. त्यानंतर, हा गुन्हा दाखल असून चौकशी सुरू असल्याचे एसीबीच्या सूत्रांनी सांगितले.