शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

एक कोटीच्या गुटखा तस्करीप्रकरणी तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 03:33 IST

पालघर जिल्ह्यात पकडलेला एक कोटीहून अधिक किमतीचा गुटखा हा मुंबई आणि ठाण्यात विक्रीसाठी आणला जात असल्याची शक्यता अन्न व औषध विभागाने वर्तवली आहे.

ठाणे : पालघर जिल्ह्यात पकडलेला एक कोटीहून अधिक किमतीचा गुटखा हा मुंबई आणि ठाण्यात विक्रीसाठी आणला जात असल्याची शक्यता अन्न व औषध विभागाने वर्तवली आहे. याप्रकरणी ट्रकचालकासह मालक आणि यामध्ये सहभागी असलेल्या एकूण १० जणांविरोधात कासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तर, गुटखा घेऊन राज्यात येणारे ट्रकचालक मनीष मौर्य, रामजित सरोज आणि सुशीलकुमार राममिलन या तिघांना अटक केली असून त्यांना (२४ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली.गुजरात राज्यातून गुटखा ट्रकमधून पालघर जिल्ह्यातील अहमदाबाद-मुंबई महामार्गावरील चारोटीनाक्यावरून येत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाली होती. त्यानुसार, सापळा रचून पकडलेल्या तीन ट्रकमध्ये एक कोटी पाच लाख ९६ रुपयांचा गुटखा पकडण्यात आला.त्या ट्रकसह ५०२ गोण्यांतील मुद्देमाल अन्न व औषध प्रशासनाने जप्त केला. तसेच त्या तीन ट्रकचालकांसह तिन्ही ट्रकमालक आणि यामध्ये सहभागी असलेले प्रथमदर्शी निदर्शनास आलेल्या एकूण १० जणांविरोधात भा.दं.वि कलम ३२८ सह अन्न सुरक्षा मानवी कायद्यान्वये गुन्हा दाखल केल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच हा गुटखा नेमका कुठे नेला जाणारहोता. तसेच तो कोणी मागवला होता. याचा तपास सुरू आहे.यामध्ये आणखी कोणी दोषी आढळल्यास त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाने दिली. याप्रकरणी कासा पोलीस पुढील तपास करत आहेत.>आतापर्यंत १० जणांविरोधात भादंवि कलमान्वये गुन्हे दाखल होण्याची बहुधा राज्यातील पहिलीच वेळ असावी. त्यामध्ये ट्रकमालक-चालक आणि सहभागी असलेल्या १० जणांविरोधात भादंवि तसेच अन्न सुरक्षा मानवी कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला असून त्या ट्रकचालकांना अटक केली आहे.- सुनील भारद्वाज,सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग