शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
3
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
4
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
5
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
6
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
7
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
8
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
9
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
10
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
11
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
12
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
13
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
14
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
15
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
16
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
17
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
18
जळगाव जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी सागर चित्रे! उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता झाल्टे; विजयी उमेदवारांचा जल्लोष
19
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
20
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप

तिर्थक्षेत्र वज्रेश्वरी देवी मंदिरात धाडसी दरोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 17:26 IST

भिवंडी : महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असलेल्या तीर्थक्षेत्र वज्रेश्वरी देवी मंदिरात आज शुक्रवारी रोजी पहाटेच्या दरम्यान पाच ते सहा दरोडेखोरांच्या टोळीने ...

ठळक मुद्देसुरक्षाव्यवस्था कमजोर असल्याने मंदिरात दरोडापाच दिवसांपुर्वी देवीची वार्षिक यात्रा संपलीयात्रेच्या दिवसांत दरोडेखोरांनी रेखी केल्याचा संशय

भिवंडी : महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असलेल्या तीर्थक्षेत्र वज्रेश्वरी देवी मंदिरात आज शुक्रवारी रोजी पहाटेच्या दरम्यान पाच ते सहा दरोडेखोरांच्या टोळीने देवीच्या मुख्य गाभाऱ्यातील तीन दानपेट्या आणि दुस-या गाभा-यातील दोन दानपेट्या फोडून सुमारे आठ ते दहा लाख रु पयांची रक्कम चोरून नेल्याने खळबळ उडाली असून मंदिराच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.शुक्रवारी पहाटे तीन ते साडेतीन वाजताच्या दरम्यान पाच ते सहा दरोडेखोरांच्या टोळीने मंदिराच्या मागच्या बाजूने मंदिरात प्रवेश करून मंदीर सुरक्षेसाठी असलेल्या एकमेव सुरक्षा रक्षकाला मागून येऊन पकडून दोरीने त्याचे हात पाय बांधले.तसेच देवीच्या मुख्य गाभा-यातील कुलूप तोडून देवीच्या मुख्य गाभा-यात तीन दरोडेखोरांनी प्रवेश करून कटावणी आणि स्क्रूड्रायव्हरच्या मदतीने तीन दानपेट्या फोडल्या. तर पहिल्या गाभा-यातील दोन दानपेट्या फोडून त्यातील सुमारे आठ ते दहा लाख रु पयांची रक्कम गोणींमध्ये भरून पसार झाले.हा सर्व प्रकार मंदिराच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत कैद झाला आहे. या घटनेनंतर सुरक्षारक्षकाने आपली सुटका करून घेत मंदिराच्या पायथ्याशी राहणारे विश्वस्त गोसावी यांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी गावातील ग्रामस्थांना आणि पोलिसांना कळविल्याने गावकऱ्यांना या धाडसी दरोड्याची माहिती झाली. या घटनेमुळे गावातील सर्व देवीभक्तांनी देवळाकडे धाव घेतली.पाच दिवसांपूर्वी म्हणजेच तीन ते पाच मे दरम्यान वज्रेश्वरी देवी मंदिराचा वार्षिक यात्रोउत्सव पार पडला. त्यावेळी अनेक देवीभक्तांनी देवळातील देवीचे दर्शन घेऊन तेथील दानपेटीमध्ये मोठया संख्येने दान टाकले होते.याची दरोडेखोरांनी उत्सवा दरम्यान रेकी करून मंदिरात येण्यासाठी व बाहेर जाण्यासाठी जाणा-या मार्गाचा आभ्यास केल्याची शक्यता पोलीसांनी व्यक्त केली.दरम्यान देवळात मोठा दरोडा पडूनही सदर देवस्थानच्या विश्वस्त कमिटीवर असलेल्या परंपरागत विश्वस्तांशिवाय एकही विश्वस्त घटनास्थळी उपस्थित न राहिल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. या घटनेचा निषेध करण्यासाठी म्हणून आज सकाळपासून दुपारपर्यंत गावातील हार फुल विक्रेते आणि इतर व्यापा-यांनी आपआपली दुकाने बंद करून देवीमंदिराच्या पायथ्याशी जमून जाहीर निषेध केला. तसेच विश्वस्तांनी मंदिर सुरक्षेत हलगर्जीपणा केल्यामुळेच हा दरोडा पडला असल्याची भावना व्यक्त केली.यापुर्वी वज्रेश्वरीदेवी मंदिराच्या परिसरातील दत्त मंदिर, हनुमान मंदिर, गोधडे महाराज समाधी या ठिकाणी चो-या झालेल्या आहेत.या बाबत गणेशपुरी पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल करूनही या चोरींचा तपास योग्यरितीने झाला नाही.असा आरोप ग्रामस्थांनी केला असून या चो-यांची दखल घेत विश्वस्त मंडळाने सुरक्षा व्यवस्थेची कोणतीही खबरदारी घेतली नाही,असे सांगीतले. जिल्ह्यातील सर्वात मोठ्या विश्वस्त संस्थेच्या देवीमंदिराची सुरक्षा व्यवस्था केवळ एका सुरक्षारक्षकावर सोपविण्यात आली होती.याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी रोष व्यक्त करीत या सर्व बाबींची पोलीसांनी चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.घटनास्थळी स्थानिक आमदार शांताराम मोरे यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच ठाणे ग्रामिण पोलीस विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक संजयकुमार पाटील,उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप गोडबोले, गणेशपुरी पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक परशुराम लोंढे आदी पोलीस अधिका-यांनी भेट दिली आणि लवकरात लवकर दरोडेखोर पकडण्यात येतील,अशी ग्वाही पोलीस अधिकारी यांनी दिली.

टॅग्स :BhiwandiभिवंडीRobberyदरोडा