शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

जमिनी सोडण्यासाठी धमक्या :शेतकऱ्यांचा आरोप  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 05:42 IST

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या उभारणीमध्ये शहापूर तालुक्यातील मौजे वाशाळा गावची जमीन संपादित होत आहे. तीनहून अधिक पिढ्या वाशाळा येथील आदिवासी शेतकरी येथील जमिनीवर शेती करत आहेत.

शहापूर : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या उभारणीमध्ये शहापूर तालुक्यातील मौजे वाशाळा गावची जमीन संपादित होत आहे. तीनहून अधिक पिढ्या वाशाळा येथील आदिवासी शेतकरी येथील जमिनीवर शेती करत आहेत. परंतु या शेतकºयांना काही सावकार जमिनीवरचा हक्क सोडण्यासाठी धमकावत असल्याने शेतकºयांनी आपल्या सुरक्षिततेसाठी जिल्हाधिकाºयांकडे धाव घेतली.गेल्या काही दिवसांपासून समृद्धी महामार्गाच्या पार्श्वभूमीवर येथील काही अधिकाºयांवर विविध आरोप होत असल्याच्या आशयाचे वृत्त येत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकºयांनी घेतलेली ही भेट विशेष अधोरेखित करणारी ठरत आहे. मंगळवारी दुपारी आदिवासी महादेव कोळी समाज संघटनेच्या ४० हून अधिक शेतकरी महिला व पुरु षांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे येऊन जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर आणि ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांची भेट घेतली. या भेटीमध्ये शेतकºयांनी जिल्हाधिकाºयांना आपला हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी निवेदन दिले.काही सावकार मंडळी शेतकºयांच्या जमिनीवर आपला हक्क सांगत असून अनेक पिढ्यांपासून या जमिनीवर कष्ट करणाºया शेतकºयांचा हक्क हिसकावून घेत असल्याचा आरोप शेतकºयांनी केला आहे. तसेच ग्रामपंचायतीत ग्रामसभेच्या ठरावानुसार या जमिनीवर शेतकºयांचा वडीलोेपार्जित हक्क आहे, असा ठराव केला आहे. येथील सावकारांचे असे म्हणणे आहे की ‘‘१०० टक्के जमिनीचा मोबदला शेतकºयांना न देता आम्हाला मिळायला हवा कारण ही जमीन आमच्या नावावर आहे’. तर शेतकºयांच्या म्हणण्यानुसार आम्ही ५० ते ६० वर्षापासून येथील जमिनीवर काबाड कष्ट करत आहोत.अन्याय करणाºयांवर गुन्हा दाखल कराजिल्हाधिकाºयांनी पेसा अंतर्गत कूळकायद्याची योग्य कारवाई करून शेतकºयांवर अन्याय करणाºयांवर आदिवासी कायद्याानुसार गुन्हा दाखल करावा, अशी विनंती आदिवासी महादेव कोळी समाज संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर तळपाडे यांनी यावेळी केली. त्याचबरोबर यावेळी मौजे वाशाळा बुद्रुक, येथील शेतकºयांनी स्वाक्षरी करु न जमीन संपादनला दिलेली संमतीचे कागदपत्रही जिल्हाधिकाºयांना सुपूर्द केली.