शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

फेरीवाले धडकले ठाणे पालिकेवर

By admin | Updated: August 27, 2015 00:32 IST

महापालिका हद्दीत व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांवर सध्या महापालिका आणि पोलिसांकडून सुरू असलेल्या बेकायदेशीर कारवाईविरोधात ठाणे जिल्हा हॉकर्स युनियनच्या वतीने

ठाणे : महापालिका हद्दीत व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांवर सध्या महापालिका आणि पोलिसांकडून सुरू असलेल्या बेकायदेशीर कारवाईविरोधात ठाणे जिल्हा हॉकर्स युनियनच्या वतीने महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला होता. या वेळी आयुक्तांनी फेरीवाल्यांच्या न्याय मागण्यांवर ४ ते ५ दिवसांत निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याचे युनियनने सांगितले.काही दिवसांपासून शहरातील रस्ते, फूटपाथ अडवून व्यवसाय करणाऱ्या आणि आठवडाबाजाराच्या माध्यमातून रस्ते अडविणाऱ्या फेरीवाल्यांवर पालिकेने कारवाई सुरू केली आहे. परंतु, प्रत्यक्षात फेरीवाला धोरण अंतिम झाले नसताना अशा प्रकारे कारवाई करणे योग्य नसल्याचे मत युनियनने व्यक्त केले आहे. परंतु, असे असतानाही कारवाई सुरू झाली. या कारवाईविरोधात बुधवारी फेरीवाल्यांनी एकत्र येऊन पालिकेवर मोर्चा काढला होता. याचे नेतृत्व युनियनचे कार्याध्यक्ष रवी राव यांनी केले होते. या वेळी त्यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर, आयुक्तांनी येत्या ४ ते ५ दिवसांत फेरीवाल्यांच्या प्रश्नांसंदर्भात निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याने फेरीवाल्यांनी हे आंदोलन मागे घेतले. परंतु, लवकरच यासंदर्भात निर्णय घेतला गेला नाही तर मात्र तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. त्यामुळेच आता आयुक्तांच्या भूमिकेकडे साऱ्यांचे लक्ष आहे. (प्रतिनिधी)