शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नागरिक बिल्डरच्या गलथानपणामुळे हजारो ठाणेकरांचे जीव धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 11:39 IST

राम गणेश गडकरी रंगायतन समोर नागरिक बिल्डरची कन्ट्रक्शन साइट सुरू असून या साईटवरील पाणी थेट पंपिंग स्टेशनच्या जनरेटरपर्यंत घुसू लागले होते.

ठाणे- राम गणेश गडकरी रंगायतन समोर नागरिक बिल्डरची कन्ट्रक्शन साइट सुरू असून या साईटवरील पाणी थेट पंपिंग स्टेशनच्या जनरेटरपर्यंत घुसू लागले होते. हीच परिस्थिती कायम राहिल्यास पंपिंग स्टेशनवर परिणाम होऊन हजारो ठाणेकरांचे जीव धोक्यात येऊ शकतात. राम गणेश गडकरी रंगायतन शेजारी असणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कंपाऊंडमध्ये ठाणे महापालिकेचे पंपिंग स्टेशन आहे. शहरातील पाणी या पंपिंग स्टेशनद्वारे थेट खाडीत सोडले जाते. याच पंपिंग स्टेशन समोर नागरिक बिल्डरचे बांधकाम सुरु आहे. बांधकामासाठी मोठा खड्डा खोदण्यात आला असून त्यामध्ये साचणाऱ्या पाण्याचा निचरा करण्याचे कोणतेही नियोजन बिल्डरकडून करण्यात आलेले नाही. उलट हे पाणी थेट मुख्य रस्त्यावर सोडण्यात आले आहे. आज पावसाचा जोर वाढताच या साईटवरील पाणी वेगाने मुख्य रस्त्यावर आले व समोर असलेल्या एमजीपीच्या कार्यालयात, समोरच्या घरांमधे शिरले तसेच हे अचानक वाढलेले पाणी पंपिंग स्टेशनच्या जनरेटरपर्यंत पोहचले.जर हा जनरेटर बंद पडला तर संपुर्ण ठाण्यात पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच डाँ मुस रोड जलमय होऊन पाणी रंगायतनच्या कंम्पाऊंडमधे घुसू लागले होते. दरवर्षी या भागात पाणी साचत नव्हते यावर्षी बिल्डरच्या गलथानपणामुळे या परिसरातील नागरिकांसह ठाणेकरांचे जिव धोक्यात आले आहेत.