शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

इंडियन स्वच्छता लीगमध्ये ठाण्यातील हजारो शाळकरी विद्यार्थी झाले सहभागी

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: September 17, 2023 18:51 IST

ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनी दिली स्वच्छतेची शपथ

ठाणे: स्वच्छतेचा संदेश देणारे फलक, पर्यावरणपूरक प्रकल्पांच्या प्रतिकृती, गणेश मूर्ती बनविण्याची स्पर्धा आणि स्वच्छतेची सगळ्यांनी घेतलेली शपथ असा अतिशय देखणा सोहळा रविवारी दादोजी कोंडदेव क्रीडांगण येथे हजारो विद्यार्थी, शिक्षक, सफाई कर्मचारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

या सोहळ्यात, विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविण्यासाठी आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, माजी महापौर नरेश म्हस्के, अशोक वैती, मीनाक्षी शिंदे, माजी उप महापौर पल्लवी कदम, स्थायी समितीचे माजी सभापती राम रेपाळे, माजी गटनेते मनोहर डुंबरे, ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले, अभिनेते भाऊ कदम, अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर, ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर, अतिरीक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरीक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपायुक्त तुषार पवार व इतर मान्यवर उपस्थित होते.       ठाणे महापालिका क्षेत्रातील खाजगी शाळा, महापालिका शाळा येथील विद्यार्थी या सोहळ्यासाठी उपस्थित होते. शाळांनी संकल्पनात्मक रचना या विषयावरील स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यांच्या संकल्पना, प्रकल्प, सादरीकरण यांचे परीक्षकांनी परीक्षण केले. ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनी स्वच्छ्ता राखण्याचे महत्त्व थोडक्यात सांगितले. इंडियन स्वच्छता लीग हा स्वच्छतेचा महोत्सव आहे. त्यानिमित्ताने, ठाणे महापालिकेत सफाई काम करणाऱ्या कांता ठाकूर आणि अनिल ठाकूर या दाम्पत्याचा प्रातिनिधिक सन्मान आजच्या सोहळ्यात करण्यात आला. या दाम्पत्याच्या हस्ते सफाई कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या विविध लाभदायी योजनेचा शुभारंभ करण्यात आला.

इंडियन स्वच्छता लीग 2.0 मधील ठाणे टायटन्स या ठाणेकर नागरिकांच्या संघाचे कर्णधार अभिनेते भाऊ कदम आणि या उपक्रमाच्या दूत अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर यांनी ठाकूर दाम्पत्याचा सन्मान केला. याप्रसंगी, भाऊ कदम यांनी स्वच्छतेत ठाणे शहर देशात अव्वल यावे यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. तर, मधुराणी प्रभुलकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत स्वच्छतेचा संदेश घरोघरी घेवून जाण्याचे आवाहन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून स्वच्छ भारत हा उपक्रम होत आहे.

स्वच्छतेसाठी त्यांनी धरलेला आग्रह आपल्या फायद्याचा आहे. त्यामुळे आजचा विद्यार्थ्यांचा या उपक्रमातील मोठा सहभाग पाहून आनंद झाला, असे प्रतिपादन आमदार संजय केळकर यांनी केले. तर, स्वच्छ वायू सर्वेक्षणात ठाण्याने देशभरात तिसरा क्रमांक पटकावला आहे. आता स्वच्छ सर्वेक्षणात सुद्धा ठाणे अग्रेसर राहील, अशी अपेक्षा आमदार निरंजन डावखरे यांनी व्यक्त केली. त्याचवेळी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शहर म्हणून आपली जबाबदारी मोठी आहे. विद्यार्थी स्वच्छतेचे खरे दुत बनतील आणि हा संदेश घेवून घरी जातील, असे प्रतिपादन माजी महापौर नरेश म्हस्के यांनी केले.

टॅग्स :thaneठाणे