शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

आंबा महोत्सवात ठाणेकरांनी फस्त केले १ कोटींचे आंबे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 06:20 IST

ठाण्यात सुरू असलेल्या आंबा महोत्सवात,ठाणेकर नागरिकांनी अवघ्या आठ दिवसात १ कोटी रुपयांचा कोकणातील हापूस आंबे फस्त केले आहेत. तर,शेवटच्या दोन दिवसांमध्ये जवळपास आणखी ४५ लाखांचा आंबे फस्त होण्याची शक्यता आयोजकांनी वर्तवली आहे.

- पंकज रोडेकरठाणे - ठाण्यात सुरू असलेल्या आंबा महोत्सवात,ठाणेकर नागरिकांनी अवघ्या आठ दिवसात १ कोटी रुपयांचा कोकणातील हापूस आंबे फस्त केले आहेत. तर,शेवटच्या दोन दिवसांमध्ये जवळपास आणखी ४५ लाखांचा आंबे फस्त होण्याची शक्यता आयोजकांनी वर्तवली आहे. या महोत्सवात एखादा आंबा खराब निघालास त्या बदल्यात दुसरा आंबा दिला जात असल्याची माहिती आयोजकांनी दिली.महाराष्टÑ राज्य कृषी पणन मंडळ पुरस्कृत आणि संस्कार व कोकण विकास प्रतिष्ठान यांच्यावतीने ठाण्यात १ ते १० मे दरम्यान हा महोत्सव आयोजिला आहे. यामध्ये प्रामुख्याने देवगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे ३५ स्टॉल्स् आहेत. तेथे ४५० रुपये इतका डझनाचा भाव असून दिवसभराच्या सरासरीनुसार या महोत्सवात १,८०० रुपयांच्या ४ डझन असलेल्या २० पेट्यांची खरेदी केली जात आहे. त्यानुसार त्या ३५ स्टॉल्स्वरून २ लाख ८८ हजार डझन आंबे खरेदी केल्यामुळे या महोत्सवात अवघ्या आठ दिवसात १ कोटी ८० हजारांची उलाढाल झाली. तर, शेवटच्या दोन दिवसात आंबे सवलतीत मिळतात, म्हणून आंबे खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होते. त्यामुळे या दोन दिवसात जवळपास ४५ लाखांची आणखी उलाढाल होण्याची शक्यता या महोत्सवाचे आयोजक राजेंद्र तावडे यांनी लोकमतशी बोलताना वर्तवली. या महोत्सवाचे हे १३ वर्ष असून मराठी चित्रपटसृष्टीतील विविध मराठी कलाकरांनी आंब्याची चव चाखली आहे.शेतकºयांना महोत्सवात स्टॉल : या महोत्सवात आंब्यांचे मोठे व्यावसायिकांकडून दरवर्षीप्रमाणे यंदाही स्टॉल्स मिळावेत अशी मागणी होती. पण, शेतकºयांना या महोत्सवात प्रामुख्याने प्राधान्य दिले जाते. ते देताना, त्या शेतकºयांचा सातबारा आणि आंब्यांची झाडे पाहण्यात येतात. त्यामुळे येथे नैसर्गिकरित्या आंबे पिकवले जात असल्याने येथे कोणतीही फसवणूक केली जात नाही. त्यातच खराब आंबा निघालास,पुन्हा आंबा दिला जाण्यात येत आहे.११ एप्रिल ते २७ मे दरम्यान, दादर, ठाणे, विर्लेपाले, बोरीवली आणि मुलुंड या पाच ठिकाणी आंबा महोत्सव भरला जात आहे. त्यानंतर वातावरण आणि पावसाळा लक्षात आंबे विक्री करणे थांबवले जाते. तसेच गतवर्षात ठाण्यात महोत्सवात साधारणता: एक ते दीड कोटी रुपयांचे आंब्यांची उलाढाल झाल्याची माहिती आयोजकांनी दिली.

टॅग्स :Mangoआंबाthaneठाणे